आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरबदर की खाक थी तकदीर में...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. आसिया पटेल

उर्दू सािहत्याबरोबरच इंग्रजी साहित्य आणि भाषांतराच्या प्रांतात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आणि ज्यांच्या लिखाणाला नाट्यरूपात रंगमंचावर अवतरण्याचे भाग्य लाभल,े अशा बिल्किस यांच्याबद्दल आजच्या सदरात...
 
अहमदाबाद इथं १ सप्टेंबर १९३८ ला इनायत उरर्रहमान इनायत यांच्या घरी बिल्किस यांचा जन्म झाला. त्यांच्या वडलांचे उर्दू साहित्यात खूप योगदान आहे. विशेष म्हणजे ते उत्तम भाषांतरकार होते. शायरी लेखनाची सुरुवात बिल्किस यांनी वयाच्या तेराव्या वर्षी केली. पण वडलांच्या आग्रहाखातर त्यांनी बालकथांचे लेखन केले. त्या शायरीपासून दुरावल्या. बालकथांच्या बरोबरीनं त्यांनी नाट्यलेखनही केले. इंग्रजी नाटकांचे उर्दू भाषांतरही केले. चेकोव्ह, डेव्हिड कॅम्पटन, टेनिस विल्यम यांच्या नाटकांना भारतीय नाट्याचे स्वरूप देऊनही बिल्किस यांनी लिखाण केले. 

उर्दू अकादमी दिल्लीच्या ड्रामा फेस्टिव्हलसाठी तसंच श्रीराम सेंटर, दिल्ली इथं त्यांच्या लिखाणावर आधारित नाटकाचे प्रयोग झाले. त्यांनी भाषांतर केलेल्या नाटकांचा संग्रह ‘मांगों की आग’ या नावानं प्रसिद्ध केला. 


खुद पे ये जुल्म गवारा नहीं होगा हमसे
हम तो शोलों से ना गुजरेंगे ना सीता स
मझे 

‘गिला इंधन’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. त्यातील कविता ज्ञानपीठ प्रकाशनाच्या ‘भारतीय कविताएं’ याअंतर्गत प्रकाशित झाल्या होत्या. अनेक वर्षांनंतर दिल्ली अकादमीच्या एका कार्यक्रमात बिल्किस यांची भेट राज नारायण राज यांच्यासोबत झाली. राज यांनी बिल्किस यांना पुन्हा शायरी लिखाणाचा सल्ला दिला. त्यानुसार बिल्किस यांनी पुन्हा लिहायला सुरुवात केली. त्यांच्या मते वडलांनी शायरी करण्यास मनाई केली. पण शेर मी लिहीत नाही तर ते शेर स्वत:ला माझ्याकडून लिहून घेतात, माझ्या लेखणीतून आपोआप उतरतात, असं त्या म्हणत.


दरबदर की खाक थी तकदीर में
हम लिए कांधों पे घर चलते
रहे

ऐवान ए उर्दू, शायर, आजकल, जहने जदिद, साबरनाया या मासिकांमधून त्यांची शायरी प्रकाशित होऊ लागली. सर्वांनी त्यांना प्रोत्साहन दिले. कौतुक केले. बिल्किस यांच्या ‘हाऊसवाइफ’ या कवितेचे भाषांतर वनराज कोमल यांनी केले. ती कविताही लोकांना खूप आवडली होती. 


जाने क्या कुछ है आज होने को
जी मेरा चाहता है रोने को
कितने सादा हंै हम कि बैठे हंै
दाग-ए-दिल आसुओंसे धो
ने को

याशिवाय बिल्किस यांनी कथाही लिहिल्या. त्यांचा ‘विराने आबाद घरों के’ हा कथासंग्रह २००८ साली प्रकाशित झाला. ‘दिलचस्प’ नावाचा बालकवितांचा संग्रह त्यांनी लिहिला. साहित्यातल्या त्यांच्या भाषांतराच्या योगदानासाठी त्यांना उर्दू अकादमीतर्फे गौरवण्यात आले होते.


दहका पडा है आतिश 
ए गुल से शजर शजर
अपना चमन खिला भी तो 
शोलों के
दरमियान

बिल्किस यांच्या लिखाणाबद्दल अनीस आझमी म्हणतात, बिल्किस जफर उल हसन की अदबी बसीरत उनकी लियाखत की तर्जुमान है. मुसन्निफा की जबान व बयान पर पकड के पेशे नजर बयानियासे इन्साफ करने का हुनर उन्हे खुब आता है. (बिल्किस यांची साहित्यिक दृष्टी ही त्यांच्या योग्यतेची साक्ष देणारी आहे. कथा, कविता अथवा शेरोशायरी इतर कुठल्याही साहित्य प्रकारात योग्य ठिकाणी योग्य शब्दरचनेचं त्यांचं हुनर वाखाणण्यासारखं आहे.)
बिल्किस यांनी त्यांच्या लिखाणात सातत्य ठेवावे यासाठी त्यांचे पती, मुली, जावई यांचे खूप मोठे योगदान आहे. या सर्वांनी बिल्किस यांना वेळोवेळी लिहितं राहण्याचा सल्ला दिला. 


तेरी तो बिल्किस निराली ही बाते हैं
इस दुनिया मंे कैसे तेरा गुजारा ह
ोगा

बिल्किस यांची गणना भारताच्या प्रसिद्ध शायरांमधे होते. सध्या त्यांचे वास्तव्य दिल्ली इथे आहे. उर्दू साहित्यात आणखी भर टाकून त्यांनी उर्दूला समृद्ध करावे यासाठी त्यांना शुभेच्छा...

लेखिकेचा संपर्क : ८३२९५५०३१५
 
 

बातम्या आणखी आहेत...