आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैं कई रंगों से बनी हूं...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ.आसिया पटेल

प्रामाणिक, काळजीनं आणि जीव ओतून केलेल्या लेखनामुळे गुलनार यांनी साहित्यक्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केलेले आहे. त्यांच्या या वैशिष्ट्यांमुळेच त्या केवळ साहित्य क्षेत्रातच यशस्वी आहेत असे नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही त्या तितक्याच सक्रिय आहेत.


मुक्तारुन्निसा बेगम म्हणजेच गुलनार आफरीन यांचा जन्म १५ ऑगस्ट १९४२ ला भारतातील टौंक संस्थानात झाला. याच संस्थानाच्या नवाब खानदानाशी त्यांचा संबंध आहे. शायरीचं कौशल्यं जणू त्यांना आनुवांशिकतेनंच मिळालं होतं. त्यांचे मोठे भाऊ आणि वडीलही शायरी करत. त्यांचे वडील वासिख टौंकी हे जोश मलिहाबादी व अदलीब शादानी यांच्याच काळातील शायर.

गुलनार यांनी आपल्या शायरीच्या प्रवासाची सुरुवात १९५६ च्या शेवटी केली. त्यांचा विवाह मोहंमद हुसेन आजाद यांचे पणतू नासिर हुसेन झैदी यांच्याशी झाला. झैदी हे व्यवसायानं अभियंता होते. परंतु त्यांनी गुलनार यांना त्यांच्या साहित्य लेखनात खूप मदत केली. गुलनार यांचे पती अभियंता असल्यानं त्यांना वेगवेगळ्या देशांत प्रवास करण्याची संधी मिळाली. १९८७ मध्ये गुलनार पाकिस्तानात आल्या. 

गुलनार यांच्या शायरीत तत्कालीन परिस्थितीचे वर्णन दिसून येते. आजूबाजूच्या वातावरणाचे पडसाद गुलनार यांच्या शायरीत आणि इतर लेखनातही उमटलेले दिसतात. त्यांच्या शायरीची मांडणी ही व्यक्तिगत, सामाजिक, सांस्कृतिक, राजकारणी इत्यादी विषयावर आहे. गुलनार यांचे लेखन प्रामुख्याने गझल आणि नज्म या प्रकारात आहे. ‘जहर ए तनहाई,’एतराफ, परास्तिश, बिखरा नगमा, उलझा गीत हे त्यांचे नज्म संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. 


गुलनार हर इक शेर से जाहिर है तेरा गम
अशआर कभी यू ही सुनाए नहीं ज
ाते

प्रामाणिक, काळजीनं आणि जीव ओतून केलेल्या लेखनामुळे गुलनार यांनी साहित्यक्षेत्रात स्वत:चे असे स्थान निर्माण केलेले आहे. त्यांच्या या वैशिष्ट्यांमुळेच त्या केवळ साहित्य क्षेत्रातच यशस्वी आहेत असे नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही त्या तितक्याच सक्रिय आहेत. साहित्यामधील आपल्या यशाचे श्रेय गुलनार आपल्या पतीला देतात. त्या म्हणतात, जिवापाड प्रेम करणाऱ्या जीवनसाथीमुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते.  नवऱ्याच्या सहवासामुळे माझे जीवन अधिकच उमलून आले आहे. कारण साहित्यातील चढउतार असो की कुटूंबातील प्रश्न यामध्ये ते नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले. ते एक प्रामाणिक पती, प्रेमळ वडील आणि सर्वांशी सहानुभूतीने वागणारा एक मित्र आहेत.’ शाम का तनहा सितारा हा गुलनार यांचा काव्यसंग्रह त्यांनी आपल्या पतीसाठीच लिहिला होता. 


जब तसव्वूर में तुम आओ तो गजल होती है
हर गजल फिक्र का इक ताजमहल होती
है 

गुलनार यांनी त्यांच्या शायरीत स्त्रीत्वाची जाणीव वेगवेगळ्या रंगांत दर्शवली आहे. त्या म्हणतात,


कई अक्स निखरे मेरी रानाई फन ने
एक रंग नहीं मंै कई रंगों से बनी
हूँ

गुलनार यांच्या लिखाणाबद्दल बोलताना उर्दूतील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. वजीर आगा म्हणतात, गुलनार आफरीन एक ऐसा दर्दमंद दिल रखती है जो जुल्म, नाइन्साफी, बेरहमी, या इन्सानी हुकूक की पामाली जैसे छोटे छोटे वाकियात से भी मुतासिर हो जाती है...

गुलनार यांनी शायरीसोबतच कथालेखनही केले. उर्दू साहित्यात गझल, नज्म, शायरी आणि त्याच वेळी कथालेखनातही आपला ठसा उमटवणारे कमी साहित्यक आहेत. गुलनार या अशांपैकीच एक आहेत. साहित्याचे बहुतांश प्रकार त्यांनी लीलया हाताळले. त्यांचे पलक पलक सिमटती रात आणि फूल और वो असे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. साहित्यातील योगदानाबद्दल गुलनारांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. आजही त्या साहित्य क्षेत्रात योगदान देत आहेत.   


मेरे अशआर में एहसास की शिद्दत क्यों है
कैसे समझाऊं मुझे तुमसे मुहब्बत क्यों है
...

लेखिकेचा संपर्क : ८३२९५५०३१५

बातम्या आणखी आहेत...