आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. आसिया पटेल निसार फातेमा ही अझिमाबादच्या विद्वान आणि साहित्यिक कुटुंबातील होती. त्यांची आई रशिदुन्निसा उर्दूची पहिली महिला कादंबरीकार होत्या.निसार फातेमाचे वडील अझिमाबादचे श्रीमंत व कायदेपंडित होते. त्यांच्या आईने दिलेल्या प्रशिक्षणामुळे वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी कविता लिहिण्याची सुरुवात केली. त्यांच्या कवितेत प्रख्यात कवी शाद अझिमाबादी यांनी अनेक सुधारणा केल्या. त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी कवितांचा सराव केला. त्यांच्या काही प्रसिद्ध कवितांची नावे अशी आहेत : मसनवी अंजुमन, ताडीनामा, अहमदनामा. त्यांच्या बऱ्याच कविता लोकांची टिंगल करणाऱ्या होत्या. यावर त्यांच्या मोठ्या भावाने प्रचंड नाराजी व्यक्त केली आणि मुलींनी या प्रकाराची कविता करणे चुकीचे आहे, असे त्यांना सुनावले. भावाच्या अशा वागण्याचा त्यांच्या मनावर गंभीर परिणाम झाला. त्यांच्यावर कविता करताना अनेक बंधने होती तरीही त्याच्या आईने नेहमीच तिच्या क्षमतांना प्रोत्साहन दिले आणि आईच्या पाठिंब्यामुळे ती पुन्हा कविता करायला लागली. त्याच्या आई आणि काही इतर हिंदू महिलांनी मिळून मुलींसाठी एक शाळा सुरू केली. त्याच शाळेच्या वार्षिक मेळाव्यात निसार फातेमा यांनी भारतीय महिलांच्या समस्या आणि दु:खावर खूप चांगली कविता केली. “सुनो हिंदुस्तानवालो तुम ऐ हिंदू- मुसलमानो तुम ही आपस के कुल झगडों को बैठके मिटा सकते ।” “खबरदार एे निसार उनसे न कहना राज उल्फत का के नाकामी सजा-ए-इन्केशाफे हालत ए दिल की ।” त्यांच्या या कवितेच्या पंक्तीवरून लक्षात येईल की त्या किती संवेदनशील कवयित्री होत्या. त्यांचा काव्यसंग्रह “खयालाते कबुरा” १९३९ मध्ये प्रकाशित झाला आणि त्याला बरीच लोकप्रियता मिळाली. बिहारमधील शाहा आबाद येथील राहणारे प्रसिद्ध अलीम फाजील कुटुंबामध्ये सय्यद रजा करीम यांच्याशी त्यांचे लग्न झाले. दुर्दैवाने त्यांच्या सासरचे वातावरण हे त्यांच्या विचारांशी पूरक नव्हते. खूप विरोध होत असतानादेखील त्या कविता लिहीत राहिल्या. त्यांच्या याच संघर्षाबद्दल उर्दूची प्रसिद्ध लेखिका “कहकशा शबनम” म्हणतात की “पता नहीं कैसी कैसी सलाहियते इस तहजीबी जब्र की सूली पर लटक चुकी है।” प्रसिद्ध शायर शाद अझीम आबादी नेहमीच म्हणतात की, “शायर माँ के पेट से ही शायर पैदा होता है।’’ आणि निसार फातेमा यांनी त्यांचे हे शब्द खरे केले व खूप सुंदर शायरी केली. संपर्क -८३२९९५५०३१५
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.