आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसाफिर परिंदो की मंझिल कहाँ...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘शेरा’ उर्दू शायरी की पहली निसाई आवाज है, जिसने अल्फाज को सैखल करके ऐसा पारदर्शनी बनाया है की इसकी हर बात मारवाई लगती है...’- काझी सलीम
 

हैदराबादच्या प्रसिद्ध शायरा शफीक फातेमा शेरा यांचा जन्म १९३० साली नागपूर इथं झाला. त्यांचे वडील सय्यद शमशाद अली उत्तरप्रदेश मधील सहारनपूरचे रहिवासी होते. फाळणीनंतर ते औरंगाबादेत स्थायिक झाले. फातेमा यांना बालपणापासून त्यांना वाचनाचा छंद होता. त्यांच्या घरात ऐतिहासिक, व सुफी संत साहित्य मोठ्या प्रमाणावर होते. शायरी शिवाय शेरा यांना प्रेमचंद यांच्या कांदबऱ्या वाचण्याचा छंद होता. रामायण, महाभारत यांच्यासह अल्लमा इकबाल यांच्या जर्ब - ए- कलीम या ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. त्यांचे उर्दू, फारसी, अरबी भाषांवर प्रभुत्व होते. त्यांचे शिक्षण औरंगाबाद इथं झालं. १९६० मधे मराठवाडा विद्यापीठातून बी.एड. तर १९६२ मधे नागपूर विद्यापीठातून पदव्यूत्तर शिक्षण पुर्ण केले. तिथल्याच एका महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून त्या रूजू झाल्या. 


सखी फिर आ गई रूत, झुलने की गुनगुनानेकी
सियाह आँखो की तह मे बिजलीयोंके डुब जाने की
सुबूक हाथों मे मेहंदी की हरी शाखे झुकाने की
लगन मे रंग, आंचल मे धनक के मुस्कुराने की 

 

शेरा च्या शायरीत जाणिवांची उत्कटता, चिंतेची गहनता आणि बुद्धीमत्ता झळकते. यामुळेच त्या काळातील इतर शायरांपेक्षा शेरा चे वेगळेपण प्रकर्षाने जाणवते. उर्दू साहित्याची संस्कृती, परंपरा यांचा त्या एक दुवा आहेत. १९६२-६३ मधे त्यांच्या घरी साहित्याच्या मैफली होत असतं. त्यात येथील प्रसिद्ध शायर व साहित्यिक जसे काझी सलीम,बशर नवाज, सफियोद्दीन सिद्दीकी, डॉ. अली जाफरी, यांच्या बरोबर साहित्यातील मैफलींमधे शेरा उत्स्फुर्तपणे सहभागी होत असतं. कमी वयातच त्यांनी शायरी लिखाणाला सुरूवात केली होती. १९५३ मधे त्यांची पहिली कविता ‘फुसिले औरंगाबाद’ प्रसिद्ध झाली. या कवितेत त्यांचे औरंगाबाद शहराबद्दलचे प्रेम दिसून येते तसेच औरंगाबाद सोडण्यामुळे झालेले दु:खही दिसून येते. ‘ गिला ए सफुरा ’ या त्यांच्या १९८७ मधे प्रकाशित पहिल्या कवितासंग्रहात त्यांच्या भावना, मानसिक गुंतागुंत आणि संवेदनशिलता दिसून येते. 
 

ये फासिले पारिना, ये खंडहर ये सन्नाटा किस खयाल मे गुमसुम है
रहगुजर आखिर एकेक जर्रे जर्रे से बु ए इश्क आती है
दूर की हसी दुनिया आह कितनी प्यारी है


शेरा यांनी नेहमीच बुद्धिमत्ता, धर्म आणि सुफी वा:डमय या विषयांवर अधिक रचना केल्या. त्यांनी आपल्या कवितांमधून स्त्रियांच्या धार्मिक अधिष्ठानाबद्दल लिहीले. त्यांची ‘असीर’ ही कविता त्याचे उत्तम उदाहरण आहे. स्त्री कशा प्रकारे भावनिक बंधात बांधलेली असते हे त्यांच्या कवितांमधून दिसून येते. शेरा यांना येणाऱ्या काळातल्या नवीन बदलांबद्दल नेहमी भिती वाटत असे. काळजी वाटत असे. जगात शांती असावी. जगाच्या गोंधळात आपण आपल्या संस्कृतीचे नियम विसरू नयेत याचा एक मूक संदेश त्यांच्या रचनांमधून दिलेला दिसतो. त्या लोकांना नेहमी दहशतवाद, भांडण, युद्ध आणि हिंसेपासून दूर राहण्यास सांगत. 


शफी उर रहम, उफ्ताद गाहे नुजुम की हे त्यांच्या विचारांचे प्रतीक आहे. त्यांच्या प्रसिद्ध कवितांमधे जब भी सहर आई, याद मगर, मुसाफिर परिंदे इत्यादी प्रसिद्ध रचना आहेत. सीता या कवितेत त्या म्हणतात, 


तेरा नाम लेकर सहर जागती है
तेरे गीत गाती है तारो की महफिल
तेरी खाक ए पा हिन्द का राज ए अज्मत
तेरी जिंदगी मेरे ख्वाबो की मंझिल

 

शेरा यांच्या रचनांबद्दल प्रसिद्ध शायर फुजैल जाफरी म्हणत, की इंग्रजी साहित्यात जे स्थान जेन ऑस्टन यांचं आहे तेच स्थान उर्दू साहित्यात शफीक फातेमा शेरा यांचं आहे. एकुणच शेेरा यांच्या रचनांमधून भावना, जाणिवा, धर्म, परंपरा, यांच्याबद्दलचे गहन विचार व तत्कालीन परिस्थितीचा अंदाजा येतो. २०१२ मधे यकृताच्या आजारातच शेरा यांचं निधन झालं.

बातम्या आणखी आहेत...