आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खिलौना ये बिखरता जा रहा है

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. आसिया पटेल  

अनुभव आणि प्रयोगातून तयार झालेला दृष्टिकोन लिखाणातून मांडणाऱ्या, पुरूषी मानसिकतेवर कडवट भाष्य करणाऱ्या, लेखनातून सामाजिक घडामोडी मांडूनही समाजापासून काहीशा अलिप्त राहिलेल्या सय्यद नफिसा बानो अर्थात ‘शमा’ यांच्याबद्दल आज...
 
जन्नत से निकली हुई हव्वा हे आत्मचरित्रं लिहून संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारी शायरा म्हणजे सय्यदा नफीस बानो अर्थात ‘शमा’. उत्तर प्रदेशातील गाझीपूरच्या छोट्या गावात शमा यांचा जन्म झाला. शमा या उर्दूच्या संवेदनशील कथालेखिका आणि शायरा आहेत. त्यांच्या कथांमधून स्त्रियांची मानसिकता आणि पुरुषांच्या वागण्यातील विविध पैलू दिसतात.  स्त्रियांवर होणारे अन्याय हे पुरुषांमार्फतच होतात. पुरुष नेहमीच स्त्रियांवर वर्चस्व गाजवत आले आहेत, असा सूर त्यांच्या लेखनातून दिसतो. 


दर्द ही इश्क का जेवर है इसे रहने दो
शमाँ की लौ को बढाओ तो कोई बात
बने

१९८५ मध्ये शायरीकडे त्या वळल्या. आजवर त्यांची शायरीसंदर्भातली पाच पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. 


दर्द को रहने दो दिल मंे, ऐ मेरे चारागरो
एक दिन ये दर्द  ही मेरी दवा हो ज
ाएगा 
 
हा त्यांचा पहिला शेर. त्या स्वत:च्या लिखाणाबद्दल असे म्हणतात की, ये किताबे नहीं, मेरी जख्मों का ताआरूफ है. मेरी जात का इजहार है, मेरे अंदर बूँद बँूद उतरती आग की शोआएे हैं और मेरे लहुलहान वजूद का आईना है’. शमा यांच्या मते, त्यांना दु:खाने इतकी साथ दिली की त्यांचे डोळे पाणावले नाहीत असा एकही दिवस जात नाही. मला हसावेसे वाटले तरी नैराश्य मला हसण्याची परवानगी देत नाही, असं त्या म्हणतात.

स्वत: समोर न येता लिखाणाच्या माध्यमातून जगासमोर येणारी ही लेखिका समाजापासून काहीशी अलिप्तच राहिली. मात्र उर्दू साहित्य विश्वातल्या घडामोडींबद्दल त्या अपडेट असतात. त्यांचे साहित्य दिल्लीच्या विविध मासिकांमधून प्रसिद्ध होत असे. शिवाय त्यांच्या लिखाणातून सुफी काव्यदेखील आढळते. त्यांच्या लिखाणात मिलनाचा आनंद कमी आणि विरहाचे दु:ख जास्त दिसते. त्यांचे लेखन वाचणाऱ्याला ते आपलेच अनुभव आहेत असं वाटतं.  अनुभव आणि प्रयोगातून तयार केलेला दृष्टिकोन शमा यांच्या लिखाणातून प्रतीत होतो. शमा यांच्या शायरीत समाजातल्या घडामोडी लक्षात येतात. त्यांच्या कथा वास्तविकतेवर आधारलेल्या आहेत. समाजातल्या वाईट प्रथा, रूढींना संपवण्याचे काम आपल्या लिखाणातून करणाऱ्या अनेक शायरांपैकी ‘शमा’ एक आहेत. कायनात घर सन्नाटा हा त्यांचा पहिला कवितासंग्रह, जाने कौनेन, कुछ दर्द के सहारे से या संग्रहाला दिल्ली उर्दू अकादमीतर्फे पुरस्कारही मिळालेला आहे. सध्या त्यांचे वास्तव्य दिल्ली इथं आहे.


मुझे मिट्टी से अब पत्थर बना दे
खिलौना ये बिखरता जा रहा है
...

लेखिकेचा संपर्क - ८३२९५५०३१५

बातम्या आणखी आहेत...