आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हम डूब गए, उसे पुकारा नहीं

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेम, आसक्ती, आणि प्रेमभंगाची वेदना दिसून येते. घुसमट आणि एकाकीपणाचं वर्णन हे ज्यांच्या शायरीचं वैशिष्ट्यं म्हणता येईल, स्त्रियांच्या समस्यांवर ज्या थेटपणे भाष्य करणं पसंत करतात त्या यास्मिन हमीद या प्रसिद्ध शायराबद्दल आजच्या भागात...
 
यास्मिन हमीद यांचा जन्म १८ मार्च १९५१ ला पाकिस्तानात झाला. त्यांना साहित्य, कला, शिक्षण क्षेत्रातला २५ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी न्युटिशन्स विषयातून पदव्युत्तर शिक्षण पंजाब विद्यापीठातून पूर्ण केले. सध्या त्या लाहोर विद्यापीठात कार्यरत आहेत. हमीद यांची पाच पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. पसे आईना, हिसार ए बे  दरोदिवार, आधादिन और आधी रात, फना भी एक सराब है व दुसरी जिंदगी. उर्दू शायरीबरोबरच इंग्रजी साहित्यातही भाषांतरकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. हमीदा या पाकिस्तानी अॅकॅडमी ऑफ लेटर्स च्या संपादिका आहेत. पाकिस्तानच्या डॉन या वर्तमानपत्रातून स्तंभलेखनही त्या करतात. 


वो जिनको  मेरा बचपन सोचना और चाहता था 
किसीकी जात मे वो रंग सारे ढूंढत
ी हूँ
 
वाचनाची आवड असल्यामुळे त्या इंग्रजी आणि उर्दू साहित्याच्या वाचक आहेत. स्त्रियांच्या समस्या त्यांनी त्यांच्या गझलांमधून मांडल्या. घराबाहेर पडणाऱ्यांना एखाद्या पुरुषाला जितक्या समस्यांना सामोरं जावं लागतं तेवढ्याच समस्यांना स्त्रियांनाही सामोरं जावं लागतं, मग ती स्त्री एखादी कारकून असो अथवा मोठी अधिकारी असं त्या म्हणत. 

हमीद यांच्या लेखनातून प्रेम, आसक्ती, आणि प्रेमभंगाची वेदना दिसून येते. घुसमट आणि एकाकीपणाचं वर्णन हेही त्यांच्या शायरीचं वैशिष्ट्यं म्हणा‌वं लागेल. हमीद या यांच्या लेखनावर मीर तकी मीर यांचा प्रभाव दिसून येतो. 


बारिश के बाद  मेहरबाँ बादल गुजर गया, धरती बहोत उदास है जख्म ए विसाल
पर
 
हमीद यांना एकटेपणा नकोसा वाटतो. त्यांना नेहमी सोबतीची आशा आणि अपेक्षा असते. त्यांच्या स्वभावात धीर आहे. त्यांनी स्त्रियांच्या वैवाहिक जीवनाबद्दल, अपेक्षांबद्दल आणि त्या पूर्ण होत नाहीत तेव्हा स्त्री काय करते याबद्दल आपल्या शायरीतून हळुवारपणे दर्शवण्याचा प्रयत्न केला. 


खुशी के दौर तो मेहमाँ आते जाते थे
उदासी डाल के डेरे हमारे घर मे
रही
 
हमीद यांनी सामाजिक जीवनाबद्दल आणि जीवन मूल्यांबद्दल लिखाण केले. आजकालच्या भौतिक जगात कमी होत चाललेल्या प्रेम, मैत्री भावनांबद्दलही आपल्या काव्यातून त्या व्यक्त होताना त्या म्हणतात,


क्यूँ मेरी तरहा अभी राख नही हो पाये
ये मेरे दोस्त मेरे आग मे जलने व
ाले
 
हमीद यांनी लाहोर येथे अल्लमा लाहोर शाळेची स्थापना केली. दूरदर्शनसाठी साहित्यक्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखतीही त्यांनी घेतल्या. 

साहित्यातील योगदानाबद्दल हमीद यांना आजवर, तमगा ए इम्तियाज, फातेमा जीना, अहमद नदीम कासमी इत्यादी पुरस्कारांनी  गौरवण्यात आलेलं आहे. 


हमे खबर थी बचाने का उस मे यारा नही
सो हम भी डूब गए और उसे पुकारा
नही
 
 

बातम्या आणखी आहेत...