आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात युवक महोत्सवाची सुरुवात, विद्यार्थ्यांनी देखाव्यातून मांडला ‘राजकीय गोंधळ‘  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सध्या युवक महोत्सव सुरू आहे. यात महोत्सवासाठी आलेल्या कलावंतामध्ये सामाजिक, राजकीय प्रश्नाकडून असलेली जाणीव याचे दर्शन शोभायात्रेतील देखाव्यातून घडले. ‘महाराष्टातील मुख्यमंत्री पदाचा पेच‘ यासह अनेक प्रश्नांना कलावंतांनी वाचा फोडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील युवक महोत्सव 21 ते 24 नोव्हेंबर दरम्यान होत आहे. 
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयापासून गुरुवारी सकाळी 10 वाजता शोभायात्रेने सुरुवात झाली. शोभायात्राचे उद्घाटन कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वत्ते, कुलसचिव डॉ.साधना पांडे, सल्लागार समितीचे सदस्य प्रा.संभाजी भोसले, डॉ.लक्ष्मीकांत शिंदे, डॉ.संजय पाटील देवळणकर, डॉ.मुस्तजिब खान, डॉ.दासू वैद्य, डॉ.संजय नवले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
  सृजनरंग या मुख्य रंगमंचाजवळ शोभायात्रेचा समारोप झाला. शोभायात्रेत 25 महाविद्यालयांनी देखावे सादर केले. प्रमुख महाविद्यालये व त्यांनी सादर केलेले देखावे पुढीलप्रमाणे :- राजर्षी शाहु महाविद्यालय (पाथ्री) - महाराष्ट्रातील महापुरुष, सिध्दार्थ महाविद्यालय (जाफ्राबाद) - स्त्री भ्रुण हत्या, भानुदासराव चव्हाण महाविद्यालय (लोहारा) -विविधतेतील एकता, संत ज्ञानेश्वर महाविद्यालय (सोयगाव) - रक्तदान पवित्रदान, कालिकादेवी महाविद्यालय (शिरुरकासार) - शहिदांना अभिवादन, शिवाजी महाविद्यालय (उमरगा) - शेतकरी आत्महत्या, सावरकर महाविद्यालय (बीड) - राजकीय गोंधळ, संत रामदास महाविद्यालय, (घनसावंगी) - ‘कोन बनेगा मुख्यमंत्री, डॉ.गंगाधर पाथ्रीकर महाविद्यालय, (सिडको) -वाहन अपघात, राजर्षी शाहु महाविद्यालय - (लासूर स्टेशन) - लोझीम, केएसके महाविद्यालय (बीड) - देवीचा गोंधळ, छत्रपती महाविद्यालय - मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ, ताराई महाविद्यालय, (पैठण) - पंढरपुरची दिंडी, वसंतराव नाईक महाविद्यालय, (औरंगाबाद) - शेतकरी आत्महत्या, तर देवगिरी महाविद्यालयाने ‘अ‍ॅमेझॉन वनवा आरे वृक्षतोड‘ यामुळे पर्यावरणाचे झालेले नुकसान यावर.