आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 63 वा महापरिनिर्वाण दिन, मुंबईतील वाहतुकीवर निर्बंध, अतिरीक्त सुरक्षा बंदोबस्त तैनात

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्य भूमीवर येतात

मुंबई- उद्या 6 डिसेंबरला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. त्यानिमित्त बाबासाहेब आंबेंडकरांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरातून लाखो लोक मुंबईतील चैत्य भूमीवर येतात. यावेळी मुंबईत ट्रॅफीकची समस्या होऊ नये, म्हणून उद्या(6 डिसेंबर) शहर वाहतूक पोलिस वाहतुकीवर काही निर्बंध लादणार आहेत.
शहर वाहतूक पोलिसांनी सांगितल्यानुसार, मुंबईतील एस. के. भोळे रोडवर एका दिशेनेच वाहतूक सुरू असेल. सिद्दी विनायक जंक्शनपासून ते हनुमान मंदीरापर्यंतची वाहतूक एकेरी ठेवण्यात येईल. तसेच, भवानी शंकर रोडवरही एकेरी वाहतू असेल. ही वाहतूक हनुमान मंदीरापासून दादर-माटुंगावरुन गोखले रोडपर्यंत असेल.

यादरम्यान गोखले रोडवरुन बेस्ट बस, अॅम्ब्यूलन्स आणि आपातकालिन वाहनांशिवाय इतर खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
तसेच, ज्ञानेश्वर मंदीर, रानडे रोड आणि एस.व्ही.एस. रोडवरील सिद्ध विनायक जंक्शनपासून हिंदूजा हॉस्पीटलपर्यंतचा रोड बंद ठेवण्यात येईल.