आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुचे यार अजनबी है क्यूँ...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद इथं जन्मलेल्या महान गझलकारा रजिया हलिम जंग विवाहानंतर दिल्ली येथे स्थायिक झाल्या. रजिया यांनी विपुल लेखन केले. आपल्या भावना आणि मनाची घालमेल त्यांनी गझल लेखनातून मांडली. 

 

उर्दू भाषा ही १७ व्या शतकात भारतात जन्मली. उर्दू भाषेच्या प्रारंभाच्या साहित्यनिर्मितीपासून जवळपास प्रत्येक शायरानं गझल हा काव्यप्रकार हाताळला. गझल हा काव्यप्रकार अरबस्तानातल्या अरबी भाषेत जन्मला. परंतू अरबी साहित्यात गझल हा काव्यप्रकार फारसा विकसित झाला नाही. परंतू ही गझल फारसी भाषेत मात्र रुजली. फोफावली आणि रसिकांच्या गळ्यातला ताईत बनली. देशातील मुस्लिमांच्या राजवटीत फार्सी ही राजभाषा होती. मगल बादशहाच्या पदरी राजकवी असायचे. 


ते अनेकदा फार्सी कवनं दरबारात ऐकवायचे. उर्दू भाषेच्या आगमनानंतर १७ व्या शतकात फार्सी भाषेतून उर्दू साहित्यातही आली आणि उर्दू साहित्याची सम्राज्ञी झाली. पुरूष शायरांच्या बरोबरीनं महिला शायरांनीही गझलेचे तंत्र आत्मसात केले. आपले विचार, भावना गझलेतून अभिव्यक्त केल्या. एकोणिसाव्या शतकात भारतात स्त्री शिक्षण सुरू झाले ते सावित्रीबाई फुले आणि फातिम शेख यांच्या अथक प्रयत्नातून. पण उर्दू भाषेच्या सुरूतीपासून मुस्लिम महिला लेखन करत होत्या. 


१९२२ साली हैदराबाद इथं जन्मलेल्या महान गझलकारा म्हणजे रजिया हलिम जंग. विवाहानंतर दिल्ली येथे स्थायिक झालेल्या रजिया यांनी विपुल लेखन केले. आपल्या भावना आणि मनाची घालमेल त्यांनी गझल लेखनातून मांडली आहे. आपल्या मनाची व्यथा व्यक्त करताना त्या म्हणतात, 

 

दिल की हालत बिगड रही है क्यूँ
हर नफस मुझको बेकली है क्यूँ
दिल लगाता है बस सदा तेरी
बेकरारी ये बढ रही है क्यूँ
उस के कुंचे मे उम्र गुजरी फिर
कुचे यार अजनबी है क्यूँ
जिस्म जंजीर हो भी सकता है
रूह आजाद है रूकी है क्यूँ
अब ये समझी हूँ जब बनी जां पर
मरकज जां तेरी गली है क्यूँ

 

विमनस्क मनातील भाव या गझलेत रजिया हलीम यांनी खूप प्रभावीपणे मांडला आहे. प्रत्येकाच्या जीवनात प्रेमाला अत्यंत वेगळे महत्व असतेच. प्रेम हा मानवी मनाचा स्थायीभाव आहे. प्रेमामुळेच सारं जग, सारे मानव एकमेकांशी जोडले गेलेत. माणसाच्या आयुष्यात प्रेम नसेल तर त्याला जगण्यात रसच नाही उरणार. पण हे प्रेम केवळ स्त्री-पुरूषांमधले नाही. तर माणसाच्या अवती भवती असणाऱ्या साऱ्या गोष्टी, साऱ्या बाबी किंवा साऱ्या व्यक्तींच्या बाबतीत असू शकते. मानवी जीवनात जसे प्रेमाला अढळ स्थान आहे तसेच गझलेचा आत्मा प्रेम आहे. प्रेम, विरह, मिलन, दुरावा या साऱ्या गोष्टी गझलेचा भाग राहिल्या आहेत. 


रजियाजींनी अनेक गझला आपल्या लेखणीतून प्रस्तूत केल्या. प्रत्येक गझलेमधे काळजाचा ठाम घेणारे शेर त्यांनी लिहीले आहेत. एक सुंदर गझलेमधे सर्वसामाप्रेमीच्या भावना व्यक्त करणाऱ्या गझलेत त्या म्हणतात,

 

तुम ही बताओ वो कौन है जो हर एक लम्हा सता रहा है
न निंद रातो को आ रही है न चैन दिन को ही आ रहा है...