आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बर पटेलांची निवड  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अ.भा.ना.सं. अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी याबाबत माहिती दिली

मुंबई- प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक जब्बार पटेल यांची 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी आज(बुधवार)त्यांच्या नावाची घोषणा केली. यंदाचे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे 100 वे वर्ष आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी जब्बार पटेल आणि प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी या दोघांचेच अर्ज आले होते. त्या दोन्ही अर्जावर नाट्य परिषदेच्या कार्यकारी समितीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत पटेल यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आला असून येत्या 14 डिसेंबर रोजी होणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीत पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचं प्रसाद कांबळी यांनी माहिती दिली.
 

बातम्या आणखी आहेत...