आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचे डाॅ. जगन्नाथ दीक्षित देणार ‘पीएमओ’तील कर्मचाऱ्यांना डाएट प्लॅन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवीण ब्रह्मपूरकर 

औरंगाबाद - ‘दिवसातून फक्त दाेनच वेळा खा, आणि नंतर फक्त पाणी पिण्यासाठी व बाेलण्यासाठीच ताेंड उघडा’ असा गुरुमंत्र देऊन आजवर देश- विदेशातील लाखाे लाेकांना उत्तम आराेग्य मिळवून देणारे औरंगाबादेतील डाॅ. जगन्नाथ दीक्षित यांना चक्क पंतप्रधान कार्यालयाने (पीएमआे) आमंत्रित केले आहे. केंद्राच्या फिट इंडिया कार्यक्रमाअंतर्गत ९  ते १३ डिसेंबर या दरम्यान ‘पीएमआे’तील ६०० कर्मचारी व स्पेशल प्राेटेक्शन ग्रुपच्या ‘एसपीजी’चे १५०० कर्मचाऱ्यांना डाॅ. दीक्षित डाएटचे मार्गदर्शन करणार आहेत.

वजन वाढण्याची समस्या सर्वत्रच भेडसावत आहे. वेगवेगळे प्रयाेग करूनही वजन कमी हाेत नसल्याने जगभरातील लाेक चिंतेत आहेत. मात्र औरंगाबादच्या ‘घाटी’ रुग्णालयातील कम्युनिटी मेडिसीनचे सहयोगी प्राध्यापक जगन्नाथ दीक्षित यांनी ‘दाेन वेळाच खा, ४५ मिनिटे चाला’ या साेप्या मंत्राने अनेकांचे वजन कमी करून दाखवले आहे.

दीक्षित यांना ‘पीएमआे’चे उपसचिव विजय कुमार मंत्री यांच्याकडून नुकतेच आमंत्रित करण्यात आले हाेते. दीक्षित म्हणाले, पीएमओच्या सचिवासह ६०० कर्मचाऱ्यासाठी ९ ते १३  डिसेंबर दरम्यान आठ  लेक्चर घेण्यात  येणार आहेत. यामध्ये ९ आणि १० तारखेला पीएमओच्या कर्मचाऱ्यांसाठी तर ११ आणि १३ तारखेला ‘एसपीजी’साठी लेक्चर घेतले जाणार आहेत. यात आयएएस दर्जाचे १५ अधिकारी तसेच कर्मचारी देखील सहभागी असतील. यामध्ये लाइफस्टाइलमधील बदल आणि लठ्ठपणा मधुमेह कंट्रोलबाबत मार्गदर्शन करणार आहेत. पंतप्रधान आणि त्यांच्या नातेवाइकांना सुरक्षा देणाऱ्या स्पेशल प्राेटेक्शन ग्रुपच्या कर्मचाऱ्यांचे आराेग्यही तितकेच महत्त्वाचे असते. या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मधुमेह नियंत्रण तसेच लठ्ठपणा टाळण्यासाठीचे धडे दीक्षित देणार आहेत. काय आहे दीक्षित डाएट ?


दिवसभरात फक्त दाेन वेळाच जेवण करणे आणि राेज न चुकता सलग ४५ मिनिटे, साडेचार किमी चालणे हा दीक्षित यांचा साधा व साेपा फाॅर्म्युला आहे. या माध्यमातून वजन कमी करणे, मधुमेह प्रतिबंध आणि ज्यांना मधुमेह आहे त्यांचा नियंत्रणात येते, असा त्यांचा दावा आहे. फक्त गरोदर महिला, अंगावर पाजणाऱ्या महिला, १८ वर्षांखालची मुले, टाइप १ मधुमेहाचे रुग्ण यांनी हा फॉर्म्युला वापरू नये, असे दीक्षित यांनी सांगितले. तसेच टाइप २ डायबिटीसबाबत आवश्यक तपासण्या करून, डॉक्टरांचा सल्ला घेऊन हा फाॅर्म्युला सुरू करता येईल. काेणत्याही गाेळ्या मनाने बंद करू नये, असे डाॅ. दीक्षित सांगतात.

 

खासदारांनाही करणार मार्गदर्शन


सात वर्षांपासून जे काम करत होतो त्याची दखल पीएमअोने घेतली आहे. आतापर्यंत ३०० ठिकाणी  व्याख्याने घेतली आहेत. जुलै महिन्यात अमेरिकेतही २२ लेक्चर घेतली आहेत. पीएमअोच्या ६०० आणि एसपीजीच्या १५०० कर्मचाऱ्यांना डाएटबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच  अजून कार्यक्रम निश्चित नसला तरी खासदारांसाठी देखील व्याख्यान आयोजित होण्याची शक्यता आहे. - प्रा. जगन्नाथ दीक्षित, मधुमेहतज्ज्ञ