आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा व्यक्ती स्व:ला म्हणवतो 'ऑल इंडिया इलेक्शन किंग', निवडणूकीत आपल्या कारनाम्यांनी बनवला आहे नवीन रेकॉर्ड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क- लोकसभेची निडणूक येत्या काही दिवसांत पार पडणार आहे. 11 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. अशातच भेटा भारतातील अशा व्यक्तीला जो स्वत:ला 'ऑल इंडिया इलेक्‍शन किंग' म्हणवतो. याचे कारणही तसेच खास आहे, कारण याने आतापर्यंत 170 निवडणूका लढवल्या आहेत, पण एकाही निवडणूकीत त्याला विजय प्राप्त करता आला नाही. त्यांच्या पराभवानेही एक नवीनच विक्रम प्रस्थापीत केला आहे. त्यांचे नाव लिम्का बूक ऑफ रेकॉर्ड्समध्ये 'भारतातील सर्वात अयशस्वी उमेदवार'असा झाला आहे.


डॉ. पद्मराजन यांना सगळे पराभूत उमेदवार म्हणतात
तमिळनाडुच्या सलेममध्ये राहणारे डॉ. पद्मराजन यांनी 1988 मध्ये पहिल्यांना निवडणूक लढवली होती, पण त्यात त्यांना जिंकता आले नाही. तेव्हा पासून त्यांनी प्रत्येक निवडणूक लढवली आणि हरली. डॉ. के. पद्मराजन यांनी आतापर्यंत 170 निवडणूका लढवल्या आहेत, पण 60 वर्षीय पद्मराजन यांनी एकही निवडणूक जिंकली नाही. त्यांचे नाव लिम्का बूक ऑफ रेकॉर्ड्समध्ये 'भारतातील सर्वात अयशस्वी उमेदवार' असा झाला आहे. डॉ. पद्मराजन एक होम्‍योपॅथिक डॉटक्‍र आहेत. त्यांनी स्थानिक निवडणूकांपासून लोकसभेही लढवल्या आहेत. इतकच काय तर त्यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूकही लढली आहे. 


या दिग्गज नेत्यांच्या विरूद्ध लढले आहेत
अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंह, प्रणव मुखर्जी, एपीजे अब्‍दुल कलाम, जयललिता आणि एम करुणानिधि.
 

बातम्या आणखी आहेत...