आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगाराची क्षेत्रे मजबूत केली पाहिजेत, त्यांना सहज कर्ज द्याल तर अर्थव्यवस्था सुधारेल : डॉ. मनमोहनसिंग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी देशात आर्थिक मंदी असल्याचे सांगून यासाठी रोजगाराची क्षेत्र भक्कम करावी लागतील, असे स्पष्ट केले. दैनिक भास्करचे राजकीय संपादक हेमंत अत्री यांनी मोदी सरकारचे १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त सरकारची धोरणे व अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांविषयी त्यांच्याशी संवाद साधला. डॉ. सिंग यांनी अार्थिक स्थिती सुधारण्यासाठी पाच निर्णय घ्यावेत, असे सांगितले... या मुलाखतीतील मुख्य अंश...

देशातील आर्थिक स्थिती कशी सुधारेल?
मोदी सरकारला एक नव्हे, दोन वेळा पूर्ण बहुमत मिळाले आहे. मी अर्थमंत्री किंवा पंतप्रधान होतो तेव्हा एवढा जनादेश नव्हता. तरीही आम्ही १९९१ मधील संकट आणि २००८ च्या जागतिक मंदीवर यशस्वीपणे मात केली. आता पुन्हा एकदा भारतासारखा देश दीर्घ आर्थिक मंदीतून मार्गक्रमण करत आहे. ही मंदी रचनात्मक आणि चक्रीय आहे. अशा परिस्थितीत सरकारने सर्व तज्ज्ञ तसेच भागधारकांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल. मात्र, दुर्दैवाने असे घडताना दिसत नाही. हेडलाईन व्यवस्थापणातून मोदी सरकारला बाहेर यावे लागेल. अगोदरच वेळ वाया गेला आहे. आता क्षेत्रनिहाय घोषणेऐवजी अर्थव्यवस्थेला एकत्रित पुढे नेण्यावर काम व्हायला हवे. यासाठी पाच पद्धती आहेत. 
पहिली : पहिली पद्धत म्हणजे सध्या लागू असलेल्या जीएसटीला अधिक तर्कसंगत करावे लागेल. मग काही काळासाठी करांमध्ये थोडे नुकसान झाले तरी चालेल. 

दुसरी :  ग्रामीण भागात मागणी व पुरवठा याच्या सुसुत्रीकरणासाठी कृषी क्षेत्राला पुनरुज्जिवीत करावे लागेल. यासाठी नव्या उपाययोजना कराव्या लागतील.यात कृषी बाजारपेठा मुक्त करून लोकांजवळ पैशाची उपलब्धता वाढवता येऊ शकेल. 

तिसरी : भांडवलाच्या उपलब्धतेसाठी सध्या कर्जपुरवठ्याची असलेली कमतरता दूर करून हे कर्ज सुलभ करावे लागेल. केवळ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच नव्हे, तर एनबीएफसीचीही हल्ली फसवणूक होत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. 

चौथी : वस्त्र, ऑटो, इलेक्ट्रॉनिक्स आणि स्वस्त घरे यासारख्या रोजगाराभिमुख क्षेत्रांना नव्याने उभारी द्यावी लागेल. यासाठी कर्ज सहज उपलब्ध व्हायला हवे. विशेषत: एमएसएमईला कर्जपुरवठा महत्त्वाचा ठरणार आहे. 

पाचवी : चीनमधील व्यापारयुद्धामुळे निर्माण होणाऱ्या नव्या निर्यातीच्या बाजारपेठा ओळखाव्या लागतील. शिवाय अंतिमत: या रचनात्मक आणि चक्रिय अडचणींवर मात करणे आवश्यक आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यात आल्या तरच तीन-चार वर्षांत चांगला विकास दर आपण गाठू शकू.

बातम्या आणखी आहेत...