आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. मनोज मुधोळकर यांचा महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - नंदुरबार येथील वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील डॉ. मनोज धोंडबाजी मुधोळकर यांना महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद, महाराष्ट्रच्या वतीने शिक्षण पुरस्काराने गौरवण्यात आले. डॉ. मुधोळकर यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 


महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्रच्या वतीने पुण्यात नुकतेच 8 व्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर मोलाची कामगिरी बजावणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. त्यात नंदुरबारच्या अक्कलकुवा येथील वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या डॉ.मुधोळकर यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कार्याची दखल घेऊन गौरवण्यात आले. महात्मा ज्योतीराव शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव आणि स्वागताध्यक्ष एकनाथ पवार यांनी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...