आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इबादत और सेहत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रमजान सुरू होऊन आज बरोबर आठवडा आहे. बहुतांश मुस्लिम बांधव या महिन्यात उपवास करतात. रमजान महिन्यात सहरी आणि इफ्तारचं विशेष महत्त्व असतं. दुसरीकडे उन्हाळाही अगदी उंचीवर पोहोचला आहे. त्यामुळे उन्हाळ्यातल्या गरमीचा सामना करत उपवास करणं काहीसं कठीण जाऊ शकतं. शिवाय आहाराच्या दृष्टीनंही रमजान महिन्याचं विशिष्ट आणि वेगळं महत्त्व आहे. 

 

सहरीचा आहार
रमजानमध्ये घेतला जाणारा आहार दोन प्रकारचा असतो.  सहरी हा पहिला प्रकार. सहरी म्हणजे सूर्योदयापूर्वी घेतला जाणारा आहार.  हा साधारणत: पहाटे ३ ते ४ च्या दरम्यानचा असतो. या वेळी अशा अन्नपदार्थांचं सेवन करावं ज्यांचं पचन सावकाश होतं. जे पचायला हलके असतात. शिवाय पुरेशा प्रमाणात फायबर मिळणाऱ्या अन्नपदार्थांचा समावेश आहारात असावा. मसालेदार पदार्थांमुळे सतत तहान लागते. शिवाय मांसाहारी आणि बेकरी पदार्थ फायबरविरहित असतात. यामुळे अॅसिडिटी, बद्धकोष्ठता वाढते. त्यामुळेच सहरीच्या वेळी गहू, तांदूळ, कॉर्न, ओटस, सालीच्या डाळी असा पोषक आहार घ्यावा.  फॅ्टस नसलेलं दही, दूध, ताक, पनीर घेऊ शकता. शिवाय फळं आणि हिरव्या पालेभाज्या खाणंही उपयुक्त ठरतं. 

 

इफ्तारचा आहार 
रमजानमध्ये घेतला जाणारा दुसरा आहार म्हणजे इफ्तार अर्थात सूर्यास्तानंतरचा आहार. यावेळेत  समोसा, कचोरी, भजे वगैरे सारखे तेलकट पदार्थ खाल्ले जातात. शिवाय शरबत अथवा कोल्ड ड्रिंकही घेतले जाते. हे सर्व पदार्थ अपौष्टिक आणि पित्त वाढवणारे आहेत. इफ्तारच्या वेळी दूध, खजूर, अंजीर, कॉर्नफ्लेक्स, बदाम इत्यादीचा आहारात समावेश करावा. सुका मेवा, टरबूज, खरबूज,इडली,. पोहे, उपमा, ढोकळा इत्यादीही सेवन करता येते. रात्रीच्या जेवणात वरणभात, पोळी, भाजी, सलाड अवश्य घ्यावे. 

 

यांनी रोजे ठेवू नयेत
मधुमेह, कॅन्सर, गर्भवती स्त्रिया, किडनी विकार असणाऱ्यांनी रोजे मुळीच करू नयेत. विशेषत: मधुमेह असणाऱ्यांनी रोजे ठेवल्यास त्यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते. शिवाय वर उल्लेखलेल्या व्यक्तींनीही रोजे ठेवू नयेत असं वैद्यकशास्त्र सांगतं. उन्हाळ्यात अशा व्यक्तींनी रोजे ठेवल्यास डिहायड्रेशन वगैरेंची समस्या उदभवू शकते.  त्यामुळे वैद्यकीय सल्ल्याशिवाय अशा व्यक्तींनी रोजे अजिबात ठेवू नये.

बातम्या आणखी आहेत...