आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : सनातनचे वकील पुनाळेकर, विक्रम भावे यांना अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी शनिवारी सीबीआयने सनातनचे वकील संजय पुनाळेकर आणि त्यांचे सहकारी विक्रम भावे यांना मुंबईतून अटक केली. या दोघांनाही रविवारी कोर्टात हजर केले जाईल. या दोघांवर दाभोलकरांची माहिती देणे, त्यांची ओळख पटवणे, हत्येनंतर पुरावे नष्ट करणे, कटामध्ये सहभागी असणे आणि आरोपींना मार्गदर्शन करणे असे आरोप ठेवण्यात आलेले आहेत. या दोघांच्या अटकेनंतर सनातन संस्थेने प्रसिद्धिपत्रक काढून पुरोगाम्यांच्या दबावातून पुनाळेकर व भावेंना अटक करण्यात आली असल्याचा आरोप केला आहे.


२०१३ मध्ये पुण्यात २० ऑगस्ट रोजी ओंकारेश्वर पुलावर सकाळी सव्वासात वाजेच्या दरम्यान डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा तपास महाराष्ट्र पोलिस लावू न शकल्याने ही केस सीबीआयकडे सोपवावी, अशी मागणी दाभोलकर कुटुंबीयांनी केली होती.

बातम्या आणखी आहेत...