आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. पद्मसिंह पाटील यांचे ४५ वर्षांत प्रथमच पक्षांतर! 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद : शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून आणि प्रत्येक संकट क्षणी त्यांच्या पाठीशी राहणारे राज्याचे माजी गृहमंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकारणात हुकमी एक्का असलेले, ४५ वर्षे उस्मानाबादच्या राजकारणावर पकड असलेले डॉ.पद्मसिंह पाटील अाणि त्यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील उद्या रविवारीच भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचंड माेठा धक्का देणारी ही अभूतपूर्व घटना मानली जात आहे. १९७४ पासून कायम शरद पवारांसोबत राहिलेले डॉ. पाटील पुत्राच्या राजकीय भवितव्यासाठी प्रथमच पक्षांतर करीत आहेत. त्यामुळे त्यांचे पक्षांतर खुद्द शरद पवारांच्या जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे. 


उस्मानाबादच्या राजकारणात गेल्या दोन महिन्यांपासून डॉ. पद्मसिंह पाटील, आ.राणा पाटील पक्षांतर करणार, अशी चर्चा सुरू आहे. उस्मानाबादकरांना ही बाब अशक्यप्राय वाटावी, अशीच होती. कारण पवारांचे निकटवर्तीय व नातेवाइक असलेले डॉ.पद्मसिंह पाटील हे पवारांची साथ कधीही सोडू शकत नाहीत, अशी पक्की धारणा उस्मानाबादकरांची होती. मात्र 'अाता आमचं ठरलं', असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचे थेट संकेत आमदार राणा पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी सोशल मीडियावरून द्यायला सुरुवात केली. त्यांनी फेसबुकवरून 'आपल्याशी मोकळा संवाद साधायचाय', अशी भावनिक साद घालत कार्यकर्त्यांना शनिवारी (दि.३१) लेडीज क्लब मैदानावर बोलावले. रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रा उस्मानाबादेत येत आहे. या यात्रेतच पाटील पितापुत्राचा भाजप प्रवेश होऊ शकतो. किंवा भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत रविवारी सायंकाळी साेलापुरात होणाऱ्या कार्यक्रमातही त्यांचा भाजप प्रवेश होऊ शकतोे

बातम्या आणखी आहेत...