आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. पायल तडवी आत्महत्या : तिन्ही महिला डॉक्टरांना जामीन नाकारला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वरिष्ठांनी रॅगिंंगमुळे कंटाळून आत्महत्या करणाऱ्या डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने तिन्ही महिला डॉक्टरांना जामीन नाकारला आहे. पायलच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा आरोप असलेल्या डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडलेवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या तिघी २० मेपासून तुरुंगात आहेत. २२ मे रोजी बिवायल नायर रुग्णालयातील वसतिगृहात मूळ जळगावची असलेल्या डॉ. पायल तडवीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डॉ. हेमा, डॉ. भक्ती आणि डॉ. अंकिता या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या वरिष्ठ विद्यार्थिनीनी तिचा वारंवार छळ केला आणि तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले, असा पायलच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. या आरोपावरून तिघींनाही पोलिसांनी २० मे रोजी अटक केली होती. दरम्यान, याप्रकरणी पोलिस महिला डॉक्टरांची कसून चौकशी करत आहेत.