आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनचे डॉ. पीटर जगातील पहिले सायबर्ग, त्यांच्या शरीराचा अर्धा भाग माणसाचा व अर्धा रोबोटिक; ते म्हणाले, मरत नाही, बदलतोय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनचे शास्त्रज्ञ डॉ. पीटर स्कॉट मॉर्गन यांनी मृत्यूसमोर शरणागती पत्करण्याऐवजी त्याच्याशी दोन हात करण्यासाठी अनोखी पद्धत अंगीकारली आहे. त्यांनी स्वत:ला विज्ञानाच्या हवाली केले आहे. स्नायूंचे गंभीर दुखणे असलेले डॉ. पीटर आता माणसाऐवजी सायबोर्ग (अर्ध अंग माणसाचे, अर्धे रोबोटसारखे) होत आहे. सायबोर्ग अशा रोबोटला म्हणतात, माणसाचा मेंदू व काही अवयव काम करतात. डॉक्टरांनी त्यांना मोटर न्यूरॉन डिसीज झाल्याचे निदान सांगितल्यानंतर डॉ.पीटर यांनी दोन वर्षांपूर्वी स्वत:ला सायबोर्गमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला. या आजारात रुग्णाचे स्नायू हळूहळू काम करणे बंद करतात. डॉ.पीटर यांना आजाराचे स्वरूप समजल्यानंतर त्यांनी मृत्यूची वाट पाहण्याऐवजी हा आजार आव्हान म्हणून स्वीकारला. आपले शरीर संपूर्णत: रोबोटमध्ये बदलल्यानंतर लोकांनी पीटर २.० नावाने ओळखावे, असे त्यांना वाटते.
डॉ. पीटर यांच्या शरीरात तीन यंत्रे बसवली गेली आहेत. अशी यंत्रे बसवणारी ते जगातील पहिली व्यक्ती आहेत. ही यंत्रे बसविण्यासाठी जून २०१८ मध्ये त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया केल्या. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्यांची अन्ननलिका थेट पोटाला जोडली. तसेच त्यांच्या ब्लॅडरला कॅथेटरने जोडले. आणखी एक वेस्ट बॅग पोटाला जोडण्यात आली. त्यातून मल बाहेर पडेल. त्यांच्या चेहऱ्याला आकार देणारी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यांचा चेहरा रोबोटिक झाला आहे. त्यात कृत्रिम स्नायू जोडले गेले आहेत. 

चेहऱ्यावर बसवलेल्या आय कंट्रोलिंग सिस्टिमने अनेक संगणक ते इशाऱ्यावर चालवू शकतात. त्यांच्यावर शेवटची शस्त्रक्रिया १० ऑक्टाेबर रोजी करण्यात आली. त्यात त्यांच्या मेंदूला आर्टिफिशियल इंटलिजन्सशी जोडण्यात आले आणि आवाज बदलला. या सर्जरीपूर्वी डॉ. पीटर यांनी म्हटले होते, मी मरत नाही. मी बदलतो आहे. 

१३.८ अब्ज वर्षांत प्रथमच एखादी व्यक्ती अॅडव्हान्स रोबोट होणार
डॉ. पीटर म्हणाले, आता ते पीटर २.० होणार आहेत. १३.८ अब्ज वर्षांत प्रथमच एखादी व्यक्ती अॅडव्हान्स रोबोटमध्ये रुपांतरित होत आहे. माझ्या शरीराच्या वरचा भाग सिंथेटिक होईल. परंतु मेंदूचा काही भाग रोबोटिक असेल. माझे शरीर हार्डवेअर, वेटवेअर, डिजिटल व अॅनालॉग होईल. मी माणूस म्हणून मरतो आहे. परंतु एक सायबोर्ग म्हणून जिवंत राहणार आहे.