आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये डॉ. प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीवर आक्षेप; काँग्रेस पदाधिकाऱ्याला जबर मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - बीडमध्ये बुधवारी उमेदवारी अर्जावरून जोरदार हाणामारी झाली. भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी  उमेदवारी अर्ज भरताना खोटी माहिती दिली असून यात काही माहिती लपवण्यात आल्याचा आक्षेप अर्ज शेतकरी संघटनेचे नेते, अपक्ष उमेदवार कालिदास आपेट व काँग्रेसचे हिंगोली प्रभारी दादासाहेब मुंडे यांनी दिला होता.  मुंडे उमेदवार नसल्याने त्यांचा अर्ज आधीच फेटाळण्यात आला. तर आपेट यांच्या अर्जावर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दुपारी सुनावणी घेत हा आक्षेप फेटाळला.  


दरम्यान, दुपारी दादासाहेब मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडत असताना त्यांची दुचाकी अडवून भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना  लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. या प्रकरणी ३ भाजप कार्यकर्त्यांसह २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...