आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधश्रद्धेचं बीज...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागच्याच आठवड्यात झालेल्या खग्रास चंद्रग्रहणाचा खगोल आणि विज्ञानप्रेमींनी आनंद घेतला. मात्र, असं असूनही यामागचे समज-गैरसमज मात्र दूर व्हायला अजूनही बराच काळ जावा लागणार आहे हे सूचित करणारा एक अनुभव.
 

 

काल अचानक  गरोदर  पेशंटची तपासण्यासाठी  गर्दी  वाढली. ओपीडी  काही  उरकेना. तेवढ्यात माझी कामवाली आली. म्हणाली, “बाई, उद्या  ग्रहण  आहे. माझ्या  पोटुशा पोरीला आणू  का  तपासायला?’ आत्ता  माझ्या डोक्यात  प्रकाश पडला. अन्  गर्दीचे कारणही  उमगले. तर  आकाशातल्या   चंद्राने   आज्ञा  दिल्याने  सगळे  पेशंट एकदम  जागरूक  झाले  होते. बरेच जण  काय  खबरदारी घ्यायची?  असा  सल्ला  विचारत  होते. जशी  काही  मी कुणी  ज्योतिषी  किंवा  त्यातली  तज्ज्ञ  आहे. असा  प्रश्न  विचारला  की  माझी  मलाच  दया  येते. कारण अंधश्रद्धेची  चीड. समुपदेशन  करण्यासाठी वेळेची  कमी. तेव्हा  हे  सगळं  कसं कडेला  लावायचं?  या  विचाराने   नुसती  त्रेधातिरपीट  उडते. त्यातूनही  चार  गोष्टी  पेशंटला  समजावून  सांगितल्या  तर, “एवढ्या  शिकूनही  बाई ‘या’ बाबतीत  अगदीच  अडाणी  आहेत’ असे त्यांच्या  चेहऱ्यावरचे  भाव. कपाळावर  हात  मारून  घ्यायची  वेळ येते  अगदी.

 

एका  बाईची  तर  फार  फजिती  झाली. सासरी  ग्रहण  नीट  पाळलं  जाणार  नाही  म्हणून  मुलीची  आई  आणि नवरा  म्हणजे  जावई  आणि  सासूने  संगनमताने  तिला  माहेरी  आणले. तीन  महिने  झाले  होते  तिला. सासरी अगदी व्यवस्थित  होती.नेमकी  माहेरी  आली  आणि  स्पॉटिंग  सुरू झाले. आता  ती  आई खूपच  घाबरली. 
“आ  बैल  मुझे  मार’ अवस्था  झाली. “उगीचंच  आणलं  बघा. आता  मलाच  निस्तारावं  लागेल’   तिचा  चेहरा ग्रहण  लागलेल्या  चंद्रासारखा  दिसू  लागला. 
 

 

विकसित देशही गैरसमजात मागे नाहीत...
गरोदरपण आणि ग्रहण आपल्याकडे  खूपच संवेदनशील विषय आहे. कारण  तो आई आणि बाळाशी संबंधित  आहे. विकसित देशही यात मागे नाहीत.
> इंग्लंडमध्ये नाडीचे ठोके जास्त तर  मुलगी, कमी तर मुलगा.
> रशिया मध्ये  नवरा  किंवा  बायकोने आपल्या आधीच्या  प्रियकराचे नाव उघड केले तर सरल प्रसूती  होते.
> पोर्तुगाल मध्ये पाळीव प्राण्याच्या सहवासाने बाळ केसाळ  होते.


जिथे माणसांचे मन गुंतलेले असते त्या गोष्टीविषयी नकारात्मक विचारांचा प्रभाव खूप जास्त असतो. आणि माणसाला कायम असुरक्षित वाटतं. आणि त्या असुरक्षिततेतूनच अंधश्रद्धेचा जन्म होतो. आणि असे चुकीचे विचार  समाजात प्रसारित होतात, रुजतात आणि एकदा का रुजले की मुळे धरू लागतात. ती घट्ट झाली की त्याचा वृक्ष  होऊन फोफावतो. त्या आधी बीजच नष्ट करणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...