Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | drawings of suspects of robbery

दरोड्याआधी रेकी करणाऱ्या संशयितांची रेखाचित्रे तयार

प्रतिनिधी | Update - Aug 22, 2018, 12:30 PM IST

कोळपेवाडी येथील श्रीलक्ष्मी ज्वेलर्स संगमनेरकर या दुकानावर दरोडा पडण्याआधी तीन ते चार दिवस रेकी केली गेल्याचा संशय स्थान

  • drawings of suspects of robbery

    कोपरगाव- कोळपेवाडी येथील श्रीलक्ष्मी ज्वेलर्स संगमनेरकर या दुकानावर दरोडा पडण्याआधी तीन ते चार दिवस रेकी केली गेल्याचा संशय स्थानिक रहिवासी व पोलिसांना अाहे. रेकी करणारी महिला व इतर दोन संशयितांची रेखाचित्रे तयार केली असल्याची माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिली. दरम्यान घटना घडून तीन दिवस उलटले, तरीही पोलिसांना कुठलेही धागेदोरे मिळालेले नाहीत. पोलिस पथके विविध राज्यांत रवाना करण्यात आली आहेत. या दरोड्यात २७ लाखांचे दागिने लुटल्याचे निष्पन्न झाले असून १४ ते २० जणांच्या टोळीने हे कृत्य केल्याचा दावा पोलिसांनी केला. जखमी झालेला सराफ गणेश सुभाष घाडगे यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले.


    या घटनेचा महाराष्ट्र सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, जिल्हाध्यक्ष संतोश वर्मा, कार्याध्यक्ष सुभाष मुथा, अध्यक्ष योगेश बागुल, उपाध्यक्ष चंदुकाका उदावंत व अन्य सराफ व्यावसायिकांनी निषेध करून तपास लागला नाही, तर पुढील आंदोलनाची रूपरेशा निश्चित केली जाईल, असा इशारा दिला आहे.


    मूळ कुटुंब संगमनेरचे
    मृत श्याम घाडगे व जखमी गणेश घाडगे हे संगमनेर येथून गेल्या वीस वर्षांपूर्वी कोळपेवाडी येथे स्थायिक झाले. या परिसरात सोन्या-चांदीच्या ग्राहकांसाठी अद्ययावत दालन असावे, म्हणून त्यांनी मोठ्या दुकानाचे काम सुरू केले होते. मात्र, नियतीला ते मान्य नव्हते. दरोडेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार करून त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवले आहे.

Trending