आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाभोलकर हत्येतील ‘ते’ पिस्तूल समुद्रात सापडले?, 7 वर्षांनंतर तपास यंत्रणेच्या हाती मोठा पुरावा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीबीआने बंदुक फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली आहे

मुंबई- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयच्या हाती मोठा पुरावा लागला आहे. दाभोळकरांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली बंदुक सापडल्याचा दावा करण्यात येत आहे. नॉर्वेच्या समुद्री एक्सपर्ट आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ठाण्याजवळच्या खारेगाव क्रीकमध्ये एक पिस्तूल सापडलं आहे. दाभोळकरांना याच बंदुकीने मारण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयेने ही बंदुक फॉरेन्सिक विभागाकडे तपासणीसाठी पाठवली आहे. खरंच ही बंदुक दाभोलकरांची हत्येत वापरण्यात आली होती का याचा तपास सध्या सुरू आहे. ऑगस्ट 2019 मध्ये सीबीआयने पुणे कोर्टाला माहिती दिली होती की, ठाण्याजवळील खारेगाव इथे शस्त्रे शोधणे आवश्यक आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून सीबीआयने 7 जणांची नावे दिली होती.
सामाजिक कार्यकर्ते डॉ नरेंद्र दाभोलकर यांची ऑगस्ट 2013 मध्ये पुण्यात अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. याप्रकरणी अनेक वर्षापासून तपास सुरु आहे. मात्र अद्याप मुख्य आरोपी सापडलेला नाही. आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने दाभोलकर हत्येत वापरलेली एक पिस्तुल शोधून काढल्याचा दावा केला आहे.सीबीआयने दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून वीरेंद्र तावडे, वकील संजीव पुनाळेकर, विक्रम भावे, शरद कळस्कर आणि सचिन अंदुरे यांच्यासह सात जणांना अटक केली होती. नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी वैभव राऊत याच्यासह कळसकर याने मुंबई, ठाणे परिसरातील खाडीत चार पिस्तुलांची विल्हेवाट लावल्याचा दावाही सीबीआयने यापूर्वी न्यायालयात केलाय. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनीच डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयने केला होता. 
 

बातम्या आणखी आहेत...