स्वदेशी उपकरणे / केमिकल डिटेक्टर : हवेतून ओळखेल ‘धोका’; रक्षात्मक सूट : त्वचेपासून दूर ठेवेल ‘विष’

रासायनिक हल्ल्याचा धोका टाळण्यासाठी ग्वाल्हेरच्या डीआरडीआय लॅबमध्ये तयार झाली २ स्वदेशी उपकरणे

दिव्य मराठी

Feb 13,2020 09:35:00 AM IST

वनिता श्रीवास्तव

भोपाळ - रासायनिक हल्ल्याची दहशत जगात मोठ्या प्रमाणावर सगळीकडे दिसून येत आहे. अन्य संहारक शस्त्रांच्या तुलनेत या दहशतवादी शस्त्रांचा नि:पात करणे राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठे आव्हान ठरले आहे. चीनमध्ये पसरलेले रहस्यमय कोरोना व्हायरसचे भय हे ताजे उदाहरण आहे. जगातील शास्त्रज्ञ यामागची कारणे शोधण्यात गुंतली आहेत. भारतासारख्या सर्वाधिक लोकसंख्येच्या देशात अशा प्रकारच्या रासायनिक एजंट्सचा नि:पात करण्यासाठी ग्वाल्हेर येथे संरक्षण संशोधन व विकास स्थापना (डीआरडीई)पूर्णत: स्वदेशी केमिकल डिटेक्टर व विशेष सूट तयार करत आहे. या सुटाचा वापर रासायनिक व जैविक हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी उपयोगी ठरतील.

डिटेक्टर बाजारातही होतील स्थापित

अति सूक्ष्म कण हवेत गॅसरूपात पसरतात. यावर नियंत्रण ठेवणे अवघड जाते. हे डिटेक्टर अशा धोकादायक घटकांचे अस्तित्व ओळखेल. यात अॉडिओ अलार्मची सुविधा आहे. याचे दोन प्रकार आहेत. पहिला पॉझिटिव्ह : हा नर्व्ह सूक्ष्म कणांची ओळख पटवतो. दुसरा : निगेटिव्ह; हा अन्य रासायनिक घटक व विषारी घटकांची सूचना देतो.

फायदा : आकाराने लहान आणि रेल्वे, बाजारपेठा, विमानतळ व गर्दीच्या ठिकाणी बसवता येईल.

बायो सूट.. त्वचेसाठी कवच

डिटेक्टरबरोबरच डीआरडीई एक जैविक सूट तयार करत आहेत. हा बायोलॉजिकल वॉरफेअरच्या वेळी घातक सूक्ष्म कणांपासून बचाव करेल. याला विशेष फॅब्रिकचे अनेक थर असतील. ते घातक कण त्वचेपर्यंत जाऊ देणार नाहीत. डीआरडीईमध्ये तयार होणाऱ्या सूटचा दर्जा आयात सूटपेक्षाही उत्तम असेल.


डीआरडीईमध्ये रासायनिक सूट तयार केले आहेत. या सूट्साही वापर भारतीय लष्कर करत आहे. वापरण्यास खूप हलके व दोन आंतरराष्ट्रीय लॅबकडून प्रमाणितही आहेत.

फायदा: युद्धांत जवानांमध्ये व लष्करी भागात बायो एजंट्ससारख्या प्राणघातक घटकांना रोखेल.

डिटेक्टरची चाचणी पूर्ण; लवकरच उपलब्ध (देवेंद्र दुबे, संचालक डीआरडीई, ग्वाल्हेर)

रासायनिक व जैविक युद्धातील शस्त्रांचा मुकाबला करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्ससारखी विकसित राष्ट्रे अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत. भारतात डीआरडीईकडे याच बायो-केमिकल एजंट्सचा मुकाबला करण्यासाठी विशेष तंत्र व तंत्राद्वारे बचाव करणारे उपकरण तयार करण्याची जबाबदारी मिळाली आहे. याच दिशेने संशोधन केेले जात आहेत. ते भविष्यात लष्कर व आम जनतेसाठी उपयुक्त सिद्ध होतील. या घातक एजंट्सवर सतत निगराणी करणे हेच बचावाचे मुख्य साधन आहे.

X
COMMENT