आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dream Girl Ayushmann Khurrana's Second Film Which Entered In 100 Crore Club

'बधाई हो' नंतर 'ड्रीम गर्ल' ठरला 100 कोटींपेक्षा अधिक कमाई करणारा आयुष्मानचा दुसरा चित्रपट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - आयुष्मान खुराणाच्या 'ड्रीम गर्ल'ने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची आकडा पार केला. चित्रपटाची प्रोडक्शन कंपनी बालाजी मोशन पिक्चर्सने सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली. बालाजीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ जारी करून ड्रीम गर्लने 11 दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण 101.40 कोटींचा व्यवसाय केल्याचे सांगितले. 
 

चित्रपटाची एकूण कमाई एका नजरेत 
पहिल्या दिवसाची कमाई : 10.05 कोटी रुपये

पहिल्या वीकेंडची कमाई : 44.57 कोटी रुपये 

पहिल्या आठवड्यातील कमाई : 72.20 कोटी रुपये

दुसऱ्या वीकेंडची कमाई : 25.45 कोटी रुपये

दुसऱ्या सोमवारची कमाई : 3.75 कोटी रुपये

आतापर्यंतची एकूण कमाई : 101.40 कोटी रुपये


 

236.80% नफ्यात चित्रपट 

राज शांडिल्य दिग्दर्शित या चित्रपटाचे बजट 30 कोटी रुपये आहे. या हिशोबाने ड्रीम गर्लला बॉक्स ऑफिसवर 236.80% नफा मिळाला आहे. चित्रपटात नुसरत भरूचा, अन्नू कपूर, मनजोत सिंग, राजेश शर्मा आणि विजय राज यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

आयुष्मानचे दुसरे शतक

ड्रीम गर्ल आयुष्मानच्या करिअरमधील 100 कोटींचा व्यवसाय करणारा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला 'बधाई हो'ने बॉक्स ऑफिसवर 136.80 कोटींचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाने 17 दिवसांत 100 कोटीचा आकडा पार केला होता. 
 

एकता कपूरचे देखील दुसरे शतक 

निर्माती म्हणून 100 कोटींच्या घरात जाणारा एकता कपूरचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख स्टारर 'एक विलन'(2014)ने 14 दिवसांत 100 कोटींचा आकडा पार केला होता. या चित्रपटाची एकूण कमाई 105.50 कोटी रुपये आहे.