Jobs / Dream Job: केवळ 60 दिवस झोपून व्हा श्रीमंत, ही संस्था देत आहे 12 लाख रुपये; जाणून घ्या कसे...

24 ते 55 वर्षे वयोगटातील लोकांसाठी नोकरीची सुवर्ण संधी

दिव्य मराठी

Apr 25,2019 04:42:00 PM IST

न्यूयॉर्क - तुम्ही जर झोपाळू आहात आणि तुम्ही त्याद्वारे दर महिन्याला कमाई करू इच्छिता तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. या नोकरीत तुम्हाला झोपण्याव्यतिरिक्त कोणतेही काम करावे लागणार नाही. हा कोणता विनोद नाही तर खरंच अशी एक नोकरी आहे. नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी झिरो ग्रॅव्हिटीचे परीक्षण करण्यसाठी अशा 24 लोकांचा शोध घेत आहे. नासा 60 दिवसांपर्यंच हे परीक्षण करणार आहे. बिझनेस स्टॅडर्डच्या वृत्तानुसार नासा यासाठी पैसे देखील देणार आहे.


24 ते 55 वयोगटातील लोकांना मिळेल लाभ
हे परीक्षण जर्मनीत करण्यात येणार आहे. यामध्ये 24 जणांची आवश्यकता असणार आहे जे 12-12 च्या दोन गटात असतील. सर्वजण 60 दिवस पलंगावरच काढणार आहे. यामध्ये सहभाग घेणाऱ्या लोकांचे वय 24 ते 55 दरम्यान असण्यासोबत त्यांनी तंदुरुस्त असणे गरजेचे आहे.


नासा प्रत्येक व्यक्तीला देणार 12 लाख रूपये

झिरो ग्रॅव्हिटीमध्ये माणसाच्या शरीरात कोणते बदल घडतात हे जाणून घेण्यासाठी नासा आणि ईएसए हे परिक्षण करणार आहे. शास्त्रज्ञ दुसऱ्या फेरीसाठी 12 लोकांची भर्ती करणार आहेत. यादरम्यान त्यांना टीव्ही, चित्रपट पाहण्यासोबत गेम्स देखील खेळता येणार आहे. यासर्व कामासाठी नासा प्रत्येक व्यक्तीला 13 लाख रूपये देणार आहे.

X