Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | dress code in pandharpur vitthal temple

विठ्ठल मंदिरातील पुजारी सेवेकऱ्यांसाठी ड्रेस कोड

प्रतिनिधी | Update - Mar 16, 2019, 11:34 AM IST

विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरातील नित्योपचार पूजा करणाऱ्या पुजारी व सेवेकऱ्यांना आता ड्रेस कोड देण्यात आला असून धोतर नेसून अ

 • dress code in pandharpur vitthal temple

  पंढरपूर - महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरातील नित्योपचार पूजा करणाऱ्या पुजारी व सेवेकऱ्यांना आता ड्रेस कोड देण्यात आला असून धोतर नेसून अंगावर उपरणे घेणे सक्तीचे केले आहे. समितीच्या वतीने धोतरजोडी व दोन उपरणे पुजारी आणि सेवेकऱ्यांना मोफत देण्यात येणार आहेत. येत्या चैत्र पाडवा अर्थात मराठी नववर्षापासून या निर्णयाची मंदिरात अंमलबजावणी होणार आहे.


  श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडे एकूण २७० कर्मचारी आहेत. त्यापैकी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजाअर्चा नित्योपचार कामामध्ये सुमारे ४८ पगारी सेवेकरी व पुजारी आहेत. समितीच्या ताब्यात असलेल्या शहरातील विविध २८ परिवार देवतांच्या मंदिरात ११ पुजारी व ३५ सेवेकरी असून त्यांना आता ड्रेस कोड देण्यात आला आहे. पांढरेशुभ्र धोतर नेसून करवती काठाचे उपरणे अंगावर घेणे त्यांना सक्तीचे केले आहे. मंदिराचे कार्यकारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी एका आदेशाद्वारे पुजारी व सेवेकऱ्यांना असा ड्रेस कोड आता सक्तीचा केला आहे. दरम्यान, पुजाऱ्यांना ड्रेस कोड सक्तीचा केल्याने अनेक सामाजिक संघटनांनी याबात आनंद व्यक्त केला, तर काही जणांनी नाराजी व्यक्त केली.

  मंदिर परिसरात हाय अलर्ट
  पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याने गृह विभागाने मंदिर परिसरात हाय अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे सुरक्षेचे उपाय म्हणून मंदिर परिसरातील व्यापारी वर्गाचे अतिक्रमण व रस्त्यावर बसून व्यवसाय करणारे, फेरीवाले यांना हटवण्याची कारवाई मंदिर सुरक्षेसाठी नेमलेले पोलिस निरीक्षक विश्वास साळोखे व त्यांचे कर्मचारी गेल्या चार दिवसांपासून करत आहेत.

  श्री विठ्ठल मंदिराजवळील पश्चिमद्वार व महाद्वार येथील छोटे व्यावसायिक व फेरीवाले यांना हटवण्यावरून आमदार भारत भालके व मंदिर पोलिस चौकीचे पोलिस निरीक्षक विश्वास साळोखे यांच्यात जोरदार बाचाबाची होऊन प्रकरण एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत गेले. स्थानिक फेरीवाल्या महिला व पोलिस यांच्यात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी भालके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, त्यांना शुक्रवारी जामीन मिळाला.

Trending