social / अंतराळवीरासारखे कपडे घालून रात्री बंगळुरूच्या खड्ड्यांच्या रस्त्यावर मूनवॉक करून वेधले लक्ष  

अंतराळवीराच्या रूपात खड्डे असलेल्या रस्त्यावरून चालताना बादल नानजुंदा स्वामी अंतराळवीराच्या रूपात खड्डे असलेल्या रस्त्यावरून चालताना बादल नानजुंदा स्वामी

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कलावंत बादल नानजुंदा स्वामींनी खड्ड्यांच्या रस्त्यावर केले आर्टवर्क सादर 

वृत्तसंस्था

Sep 04,2019 10:52:00 AM IST

बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील रस्त्यावर लोकांनी अंधाऱ्या रात्री एक अंतराळविर पाहिला. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांत चर्चा रंगली. व्हीडिओ पाहून असे वाटते की, प्रत्यक्षात अंतराळविर चंद्रावरील ओबडधोबड व खड्ड्याच्या पृष्ठभागावर चालताना दिसतो आहे. परंतु हे प्रसिद्ध कलावंत बादल नानजुंदा स्वामी यांचे हे नवे आर्टवर्क होते. या आर्टवर्कद्वारे ते बंगळुरूमधील रस्त्याची खराब अवस्था दाखवत होते. लाेकांना त्यांचे सादरीकरण खूप आवडले. अनेक नागरिकांनी तेथील रस्त्यावरून जाणारी वाहने नियंत्रित केली. नानजंुदा स्वामी अशा प्रकारे सरकार व अधिकाऱ्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रसिद्ध मानले जातात. हा व्हीडिओ पाहून एका युजरने टि्वटरवर लिहिले, विवर इतकी मोठी आहेत की, इस्त्रो चांद्र मोहिम यशस्वी करण्यासाठी सहज अंतराळविरांना प्रशिक्षित करू शकते. एका युजरने लिहिले, आमच्या देशाचे वैशिष्ट्य असे की, शहरातील कोणत्याही भागात रस्त्याची अशीही अवस्था पाहण्यास मिळेल. परंतु अशा प्रकारचे अंतराळविर पाहण्यास मिळणे ही दुर्मिळ बाब आहे.


सुरुवातीला रस्त्यावर आणली मगर तेव्हा लोक आश्चर्यचकित
कलावंत बादल नानजुंदा स्वामी यांनी संदेश देण्यासाठी कलेचा असा वापर केला. काही वर्षापूर्वी त्यांनी खड्ड्यावर एक मोठी मगर ठेवली होती. तसेच खड्ड्याच्या आजूबाजूला फुलपाखरासाठी जाळी लावण्यात आली होती. कलेचे वैशिष्ट्य असे की, या माध्यमातून तुम्ही आपला निषेध व्यक्त करू शकता. माझे शहर स्वच्छ व सुंदर दिसले पाहिजे. लोकांना त्रास जाणवू नये हीच माझी इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

X
अंतराळवीराच्या रूपात खड्डे असलेल्या रस्त्यावरून चालताना बादल नानजुंदा स्वामीअंतराळवीराच्या रूपात खड्डे असलेल्या रस्त्यावरून चालताना बादल नानजुंदा स्वामी
COMMENT