आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज तुळशीचा चहा प्या, प्रतिकारशक्ती वाढेल...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळशीच्या चहामधील अँटिऑक्सिडंट्स अनेक आजार टाळण्यास मदत करतात. हा चहा बनवण्यासाठी तुळशीच्या ताज्या पानांचा वापर करावा. मुंबईच्या आहारतज्ज्ञ डॉ. येजनेसिनी बोस यांच्याकडून जाणून घेऊया तुळशीचा चहा पिण्याचे 10 फायदे...

निरोगी त्वचा - यामधील अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा कोमल आणि उजळ बनवण्यास मदत मिळते.

कॅन्सर - तुळशीच्या चहामधील फ्लेवोनॉइड्स कॅन्सर टाळण्यास मदत करतात.

प्रतिकारशक्ती - हा चहा पिल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो.

दमा - या चहामध्ये अँटिबॅक्टेरियल गुण असतात. ते दमा टाळण्यास मदत करतात.

संधिवात - यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात. त्याचा संधिवातामध्ये फायदा होतो.

डोळे - तुळशीच्या चहामधील व्हिटॅमिन ए डोळ्यांची शक्ती टिकवून ठेवण्यास मदत करते.

मधुमेह - हा चहा पिल्यास ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते व मधुमेह होत नाही.

हृदयविकार - तुळशीचा चहा कोलेस्टेरॉल लेव्हल कमी करतो. त्यामुळे हृदयविकार टाळता येतो.

संसर्ग - तुळशीच्या चहामधील अँटी मायक्रोबियल गुणधर्म संसर्ग होऊ देत नाही.

रक्तदाब : हा चहा पिल्याने रक्तप्रवाह चांगला होतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.

बातम्या आणखी आहेत...