आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारच्या स्टेशन कर्मचा-याचे कृत्य: दारु पिऊन पडून राहिला, ग्रीन सिग्नलची वाट पाहत अडकल्या ट्रेन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुजफ्फरपुर : समस्तीपुर रेल्वे मार्गाच्या सीहो स्टेशनचा स्टेशन कर्मचारी राकेश कुमारने गुरुवारी रात्री नशेमध्ये धिंगाना घातला. यानंतर त्याची शुध्द हरपली. ग्रीन सिन्गन न मिळाल्यामुळे रात्री 10.30 वाजता समस्तीपुर रुटच्या अनेक ठिकाणांवर रेल्वे अडकल्या. सीहो स्टेशनवरुन लाइन क्लियर न मिळाल्यामुळे ढोली स्टोशनवर बरौनी-लखनऊ एक्सप्रेस रात्री उशीरा पर्यंत अडकली.

 

रात्री उशीरा कर्मचारी जागा झाला 
रात्री उशीरा त्या रेल्वे कर्मचा-याची झोप उघडली. यानंतर सोनपुरचे डीआरएम आणि कंट्रोलला याच्या सूचना देण्यात आल्या. रात्री 12 वाजता आरपीएफने त्याला अटक केली. आरपीएफचे प्रभारी इंस्पेक्टर सुजीत कुमारने अटक केल्याची माहिती दिली. स्टेशन कर्मचा-याजवळ चरसही आढळले आहे. ब्रेथ एनलाइजरच्या तपासणीत अल्कोहल आढळले आहे. सोनपुर डीआरएमने त्याचे ब्लड सॅम्पल घेऊन मेडिकल तपासणी करणे आणि कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. 

 

यापुर्वीही दारुच्या नशेत असे करत होता स्टेशनचा कर्मचारी 
यापुर्वी जंक्शनवरुन ट्रॅफिक इंस्पेक्टरने जेव्हा फोन केला तेव्हा नशेत असलेला स्टेशन कर्मचारी त्याच्याशी उध्दटपणे बोलला. काही लोकांनी ही स्टेशन कर्माचारी नशेत असल्याची सुचना उत्पादन अधीक्षक दीनबंधुना दिल्या होत्या. परंतू रेल्वेचे प्रकरण असल्यामुळे त्यांनी लक्ष दिले नाही. नंतर मुजफ्फरपुर जंक्शनवरुन ट्रॅफिक इंस्पेक्टर बीएन प्रसाद तसेच आरपीएफ नारायणपुर अनंतचे प्रभारी निरीक्षक सुजीत कुमार सीहो स्टेशनसाठी रवाना झाले. आरपीएफ नारायणपुर अनंतर आणि ट्रॅफिक इन्फेक्टरने सांगितले की, रेल्वे कर्मचा-याचे असे वागणे नवीन नाही. यापुर्वी तो कामाच्या वेळेत नशेत आढळला आहे. याची तक्रार आणि रिपोर्ट सोनपुर मंडळाच्या वरिष्ठ परिचान प्रबंधकाकडे करण्यात आली होती. आरोपी स्टेशन कर्मचा-याचा दारु पितानाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. 

 

इकडे दारुच्या नशेत वैशाली एक्सप्रेसमध्ये गोंधळ घालणारा कोच अटेंडेटला अटक 
मुजफ्फरपुर :
दारुच्या नशेत वैशाली एक्सप्रेसमध्ये गोंधळ घालणा-या कोच अटेंडेटला गुरुवारी रेल्वे पोलिसांनी अटक केली. अटक केलेला कोच अटेंडेट हा धर्मेंद्र कुमार बेगूसराय येथे राहतो. चौकशी करुन त्याला शुक्रवारी तरुंगात पाठवण्यात आले. रेल्वेचे स्टेशन अध्यक्ष अच्छेलाल सिंह यादवने याचे स्पष्टीकरण देताना सांगितले की, एसी कोच अचेंडेट नशेमध्ये कोचमध्ये धिंगाना घालत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली. यानंतर ट्रेनच्या जंक्शनवर पोहोचताच त्याला अटक करण्यात आली. यापुर्वीही त्याने महिला प्रवाशांसोबत गैरवर्तन केले होते. दोन्ही बाबतीत रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक करुन तुरुंगात पाठवले आहे. 
 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...