आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशांची हेरा-फेरी केल्यामुळे ड्रायव्हरला दोरीने पंख्याला उघडे टांगत केली बेदम मारहाण, ट्रान्सपोर्ट मालकाविरोधात गुन्हा दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - येथे ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकाने आपल्या चालकाला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. पैशांच्या हेरा-फेरी प्रकरणी मालकाने चालकाचे कपडे काढून त्याला दोरीने पंख्याला बांधत बेदम मारहाण केली. यात ड्रायव्हर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी ट्रान्सपोर्ट मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

 

आरोपीचे राजकीय पक्षासोबत आहेत संबंध
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सदरील घटना शनिवारी वाडी पोलिस ठाणे परिसरात घडली. याप्रकरणी रेणुका फायटर्स कॅरिअरचे मालक अखिल पोहनकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिलचे राजकीय पक्षासोबत संबंध असल्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता. घटनेचे 24 तास उलटून गेल्यानंतर अखिलवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

 

ड्रायव्हरवर करण्यात आला हा आरोप
विकी आगलावे असे पीडित ड्रायव्हरचे नाव आहे. सध्या गंभीर अवस्थेत असून नागपुरच्या सरकारी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. विकीने दारुसाठी कंपनीतील पैशांची हेरा-फेरी केली आणि अनेक लोकांपडून उसने पैसे घेतले. तसेच कंपनीचे पैसे परत जमा केले नसल्याचा विकीवर आरोप आहे. याबाबत शनिवारी अखिलला माहित झाल्यानंतर त्याने रागाच्या भरात आपल्या साथीदारांच्या मदतीने विकीला बेदम मारहाण केली.