आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये भरधाव येणाऱ्या मर्सिडीजचे अचानक टायर झाले लॉक, अपघातात चालकाचा जागीच मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मर्सिडीज कंपनीची कार जगातील सुरक्षित कारपैकी एक आहे. पण जर याच गाडीमध्ये काही बिघाड झाल्यास काय होऊ शकते याचे उदाहरण नाशिकमध्ये पाहायला मिळाले. नाशिकमधील आडगाव नजीक भरधाव वेगाने जाणाऱ्या मर्सिडीज कारचे टायर अचानक लॉक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चालक गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. सर्वात सुरक्षित गाड्यांपैकी समजल्या जाणाऱ्या गाडीमध्ये अचानक बिघाड झाल्याने मर्सिडीजही सुरक्षित नाहीये का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


पावसामुळे नाशिकमध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे, तसेच अनेक भागात पाऊस पडत आहे. अपघात झालेली मर्सिडीज आडगावजवळ भरधाव वेगाने आली असता, अचानक गाडीचे टायर लॉक झाले. भरधाव वेगात टायर लॉक होण्याचा बहुदा हा पहिला प्रकार असावा. वेगवान गाडीचे टायर लॉक झाल्याने गाडीने पलटी मारली आणि भीषण अपघात झाला. त्यामुळे या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला.