आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक वर्षांपासून चालवत होता साहेबांची गाडी, रिटायरमेंटच्या दिवशी अधिकाऱ्याने दिली अशी भेटवस्तू की ड्रायव्हरला आवरता आले नाही अश्रू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


शिवपुरी/ ग्वालियार : अनेक दिवसांपासून ज्या ड्रायव्हरने आपल्या अधिकाऱ्याला सरकारी वाहनातून घर, ऑफीस आणि इतर ठिकाणी घेऊन जात होता. तो आता निवृत्त झाला तर त्याच अधिकाऱ्याने ड्रायव्हरला गाडीच्या पुढच्या सीटवर बसवले आणि स्वतऋ गाडी चालवत त्याच्या घरी सोडले. ज्याप्रकारे ड्रायव्हरने अधिकाऱ्याची सेवा केली होती. त्याचप्रकारे अधिकाऱ्याने ड्रायव्हरच्या निवृत्तीच्या दिवशी त्याची सेवा केली. जल संसाधन विभागातील ड्रायव्हर रमेश शर्मा आणि त्यांचे अधिकारी एसडीओ अवधेश सक्सेना यांच्यातील हे नाते होते. 

 

जल संसाधन विभाग करैरा येथील कर्मचारी रमेश शर्मा 31 जानेवारीला सेवेतून निवृत्त झाले. या अनुषंगाने निरोप समारंभात विभागाचे वरिष्ठ अधिकारी अवधेश सक्सेना यांनी पुष्पहार आणि शाल श्रीफळ देऊन शर्मा यांचा सन्मान केला. सोबतत त्यांच्या निष्ठापूर्ण सेवेसाठी त्यांना प्रशस्तीपत्र देखील देण्यात आले. निरोप समारंभानंतर अनुविभागीय अधिकारी सक्सेना हे स्वतः ड्रायव्हरच्या सीटवर बसले आणि त्यांच्या जागेवर रमेश शर्मा यांना बसवले. यानंतर एसडीओंनी स्वतः गाडीने चालवत शर्मांना त्यांच्या घरी सोडले. 

 

नियुक्ती पत्र देणाऱ्याच्या हातूनच मिळाले निवृत्तपत्र

रमेश शर्माने सांगितले की, साहेबांनी मला दिलेले गिफ्ट मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. योगायोगाने सक्सेना साहेबांनीच मला नोकरीवर रुजु केले होते. आज त्यांच्याच हाताने रिटायमेंटचे पत्र घेत आहे. 
 

 

बातम्या आणखी आहेत...