आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - 1 ऑक्टोबर 2019 पासून देशात काही नियम लागू होणार आहेत. यात बँकिंग, ट्रान्सपोर्टिंग आणि जीएसटी बाबत बँक आणि सरकारने जुन्या नियमांत काही बदल केले आहेत. बदलत्या वाहतुक नियमांसोबत केंद्र सरकार ड्रायव्हिंग लायसेन्सच्या नियमांत बदल करण्यात आले आहेत. यानंतर तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसेन्स अपडेट करू शकाल. 1 ऑक्टोबरपासून कोणकोणते नियम बदलणार आहेत आणि कोणते नवीन नियम लागू होणार आहेत याबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
पेन्शन पॉलिसीत होणार बदल
1 ऑक्टोबरपासून पेन्शन पॉलिसीत बदल होणार आहे. 7 वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांना वाढीव पेन्शन देण्यात येणार आहे.
मायक्रोचिप असणारे ड्रायव्हिंग लायसेन्स :
नवीन नियमांतर्गत आता ड्रायव्हिंग लायसेन्स आणि नोंदणी प्रमामपत्र (आरसी) एकाच रंगाचे मिळणार आहे. या नियमांतर्गत ड्रायव्हिंग लायसेन्स आणि आरसीमध्ये मायक्रोचिपसोबतच क्यूआर कोड देण्यात येणार आहे. पण यासाठीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे.
पेट्रोल-डिझेलवर कॅशबॅक मिळणार नाही
एसबीआय क्रेडीत कार्डद्वारे पेट्रोल-डिझेलची खरेदी केल्यानंतर आता कॅशबॅक मिळणार नाही. याअगोदर क्रेडीड कार्डद्वारे पेट्रोल-डिझेलच्या खरेदीवर 0.75% कॅशबॅक मिळत होता.
एसबीआयचे नवीन नियम
एसीबीआयच्या नवीन नियमांनुसार, बँकेत मासिक सरासरी ठेवीसाठी आकारण्यात येणारा दंड 80% पर्यंत कमी केला जाईल. याशिवाय एसबीआय मेट्रो सिटीच्या ग्राहकांना 10 फ्री ट्रांजेक्शन देणार आहे तर इतर शहरांसाठी 12 फ्री ट्रांजेक्शन देण्यात येईल.
हॉटेलवर कमी जीएसटी
1 ऑक्टोबरपासून हॉटेलवरील जीएसटी कमी करण्यात येणार आहे. 7500 रुपयांपर्यंत किराया असणाऱ्या रुमवर फक्त 12% जीएसटी लावण्यात येणार आहे. एक हजार रुपये किराया असणाऱ्या रुमवर कोणताही टॅक्स नाही.
> यासोबतच पेट्रोल-डिझेल वाहनांवर सेस कमी होणार आहे. तर सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.