चालु गाडीने अचानक / चालु गाडीने अचानक घेतला पेट, ओमनीतील प्रावासी थोडक्यात बचावले...

मनीत प्रवासी होते पण कोणतीही मानव हानी झालेली नाही. 

दिव्य मराठी वेब टीम

Jan 05,2019 09:01:00 PM IST


यावल- येथील बराणपुर अंकलेश्वर मार्गावरील गिरडगाव गावाजवळ शनिवारी साडेबारा वाजेच्या सुमारास चोपड्याकडे जात असलेल्या ओमनीने अचानक पेट घेतला. ओमनीने एकदम पेट घेताच 'बर्निंग ओमनी'चे ते दृष्य होते. थोड्याच वेळात ओमनी पुर्णपणे जळून खाक झाली. आग लागली तेव्हा ओमनीत प्रवासी होते पण कोणतीही मानव हानी झालेली नाही.

यावल चोपडा रस्त्यावरील गिरडगाव गावाजवळ यावल कडून प्रवासी घेऊन जात असलेली यावल येथील रेहानखान यांच्या मालकीची ओमनी क्रमांक (एम.एच.१९ ए.एफ.५९८७) हिने अचानक पेट घेतला. वाहनात पाच प्रवाशांसह वाहन चालक असे सहा जण होते, प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. परिसरातील नागरिकांसह अग्निशमन बंबांने आगीवर नियंत्रण मिळवले. घटनेचे वृत्त कळताच यावल पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

X
COMMENT