Home | National | Other State | drought condition in bihar

बिहारमध्ये खड्डे खोदून चिखलातून बादलीभर पाण्यासाठी महिलांची भटकंती

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 22, 2019, 09:30 AM IST

एक बादली पाणी मिळवण्यासाठी अर्धा दिवस फिरावे लागते

  • drought condition in bihar
    गया - (इमामगंज) बिहारच्या गयात लाेक पाण्याच्या एकेका थेंबासाठी तरसत आहेत. हे चित्र गया जिल्ह्यातील शिवा टांड गावातील आहे. येथील गावच्या महिला एका डोंगराच्या पायथ्याशी खड्डा खोदून चिखलातून पाणी काढून पाणी काढत आहेत. महिलांनी सांगितले, येथे ७० कुटुंबे राहतात. गावातील हातपंप आटले आहेत. यासाठी चिखलातील पाणी गाळून प्यावे लागत आहे. गावात सुमारे १५ फूट खोल तीन खड्डे खोदून ठेवले आहेत. गावातील पुरुष मंडळी दुसऱ्या राज्यात मजुरीसाठी गेले आहेत. परंतु गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. एक बादली पाणी मिळवण्यासाठी अर्धा दिवस फिरावे लागते. तेथेही रांगा लावाव्या लागतात. मुलेही या कामात आयांना मदत करत आहेत.

Trending