Home | National | Other State | drought condition in chhattisgarh

छत्तीसगडच्या सोरम गावात लाेकांनी कोरड्या तलावात खोदला खड्डा, बादलीने आणून टाकले पाणी, नंतर केले धान्य विसर्जन

दिव्य मराठी | Update - Apr 16, 2019, 11:09 AM IST

42 अंशांवर तापमान आणि शासनाचा दुष्काळ

  • drought condition in chhattisgarh

    हे छायाचित्र छत्तीसगडमधील साेरम गावातील आहे. येथील गावकरी दुष्काळी परिस्थितीशी कसे झगडत आहेत याचे विदारक चित्रण स्पष्ट दिसते. चैत्र महिन्यात नवरात्र असते. देवीच्या मंदिरात घरामध्ये महिलांनी धान्य लावले. रविवारी हे धान्य विसर्जन करताना मात्र महिलांसमोर अडचणी उभ्या राहिल्या. त्यांना या धान्याचे विसर्जन कोरड्याठाक पडलेल्या तलावात करावे लागले.


    धान्य विसर्जनासाठी दुसरा पर्याय नसल्याने गावकऱ्यांनी या तलावातच एक खोल खड्डा खोदला. नंतर या खड्ड्यात बादलीने पाणी आणून भरावे लागले. नंतर विसर्जनाचा विधी पार पडला. गावातील बोअरवेल्स व कूपनलिका आटल्या आहेत. पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नाही. या गावाची लोकसंख्या २ हजार असून गावातील लोकांना शेतातील बोअरवेलमधून पाणी आणावे लागत आहे.
    फोटो स्टोरी : संदीप

Trending