आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील धरणांत 5 वर्षांतील सर्वात कमी 25% पाणीसाठा,पावसाच्या असमान वितरणामुळे धरणांत पाणीच नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जुलै संपत आला तरी राज्यातील प्रमुख धरणांत पुरेसा पाणीसाठा नाही. राज्यातील एकूण ३२६७ प्रकल्पांत सध्या फक्त २५.२१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या पाच वर्षांतील हा जुलैमधील हा सर्वात कमी पाणीसाठा आहे. 


अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि नाशिक या विभागांतील प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठा आहे. सध्या राज्यात ४७१६ टँकर सुरू अाहेत. यंदा जून ते २५ जुलैपर्यंत मराठवाड्यात २७५.७ मिमी पाऊस अपेक्षित होता, मात्र फक्त १७९.१ मिमी पाऊस झाला आहे. पावसाची ही तूट ३५% आहे. विदर्भात ४१६.९ मिमी पाऊस अपेक्षित होता, पडला फक्त २४१.० मिमी. विदर्भात ४२% कमी पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्र विभागात ३४५.८ मिमीच्या अपेक्षेच्या तुलनेत ३६८.३ मिमी पाऊस झाला असला तरी त्याचे वितरण असमान राहिल्याने धरणांत पाणीसाठा झालेला नाही.


राज्यात ४७१६ टँकर सुरू - २२ जुलैअखेर संपलेल्या आठवड्यात राज्यातील ९१४९ वाड्या आणि ३६५७ गावांत एकूण ४७१६ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. गतवर्षी याच काळात राज्यात फक्त ४५९ टँकर सुरू होते. सध्या मराठवाड्यात सर्वाधिक व त्याखालोखाल नाशिक विभागात टँकर सुरू आहेत. राज्यातील २२ जिल्ह्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गतवर्षी ११ जिल्ह्यांत टँकर सुरू होते.


शहरांत ८ ते १५ दिवसांआड पाणी  मराठवाड्यातील प्रमुख शहरांत सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. औरंगाबादेत पाच दिवसांआड, उस्मानाबाद, लातूर व बीड येथे १५ दिवसांआड, जालना शहरांत आठ ते १० दिवसांआड नळांना पाणी येत आहे. ऐन पावसाळ्यात अशी स्थिती असल्याने आगामी काळात पाऊस पुरेसा पाऊस न झाल्यास शहरांतील पाणीटंचाई भीषण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...