Home | National | Other State | drought condition in rajasthan

राजस्थानमध्ये तलावात 3 फूट खोल खड्डा खोदून गढूळ पाणी नेतात; गावकरी म्हणाले-हेच आमच्या नशिबी

दिव्य मराठी नेटवर्क, | Update - Jun 12, 2019, 11:44 AM IST

2500 लोकसंख्येच्या गावात पाणीबाणी

 • drought condition in rajasthan

  पाली - राजस्थानात पाली जिल्ह्यातील रोहट भागातील अरटिया गाव. येथील तलाव आटला आहे. या भागात पाण्याचे दुसरे जलस्रोत नाही. त्यात २५०० लोकसंख्येच्या गावातील लोक आटलेल्या तलावात खड्डा खोदतात. यात झिरपलेले पाणी येते. महिलांनी सांगितले,तलावात दोन ते तीन फूट खोल खड्डा खाेदतात. मग कुठे एक घागरभर गढूळ पाणी मिळते. हे पाणी खूप खराब व गढूळ असते. पण हेच आमच्या नशिबी आहे.हेच पाणी पिऊन लोक आपली तहान भागवतात. गेल्या काही वर्षापासून या लोकांना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागते.


  टँकर्सने पाणीपुरवठा केल्याचा दावा
  पाली जिल्ह्यातील रोहट भागात येणाऱ्या ७९ गावात सुविधांचा अभाव आहे. येथे टँकरनेे पाणीपुरवठा सुरू असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. तरीही लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.


  दिल्लीतही पाणीटंचाई
  देशाच्या राजधानीतही पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. शंकरनगर कॉलनीत लोकांना पाण्यासाठी झगडावे लागते.

Trending