आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महिन्यांनंतर उस्मानाबादवर टंचाईचे संकट; 'तेरणा'त 4 टक्के मृतसाठा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेर- अर्ध्या उस्मानाबादला पाणीपुरवठा करणाऱ्या तेरणा मध्यम प्रकल्पात मृत साठ्यात चार टक्के पाणीसाठा असून ते दीड महिना पुरेल. त्यानंतर शहराला भीषण पाणीटंचाईचे संकट भेडसावणार आहे. तसेच चार गाव पाणी पुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन झाले तरीही ही गावे पाण्याअभावी तहानलेलीच रहाणार आहेत. 

 

उस्मानाबाद शहरातील अर्ध्या भागात तेरणा मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा होत आहे. मात्र, सध्या तेरणा मध्यम प्रकल्पात मृत साठ्यात केवळ चार टक्के पाणीसाठा उपलब्ध आहेत. त्यातही मोठ्या प्रमाणात गाळ असल्याचे तेरणा मध्यम प्रकल्पाचे शाखाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यामुळे गाळ व पाणी याचे प्रमासण निश्चित नसून एक किंवा दोन महिने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. यामुळे अर्ध्या उस्मानाबाद शहराला दीड महिन्यानंतर भीषण पाणीटंचाई जाणार असल्याचे दिसून येत आहे. तेरणा मध्यम प्रकल्पात यावर्षी नव्याने एक थेंबही पाणी आले नाही. गत वर्षीच्या पाण्यावरच उस्मानाबाद शहराला तहान भागविण्यासाठी नगरपरिषदेने रोज २५ लाख लिटर पाणी उपसले जाते. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने धरणात चारी खोदून पाणी अडवून तीन पाणबुडीद्वारे उसमानाबाद पाणीपुरवठा चालू आहे. त्याशिवाय धरणा काठच्या शेतकऱ्यांनीही धरणाच्या पाण्यात आपले हात धुवून घेतले आहे. उजनी धरणा पेक्षा तेरणा धरणाचे पाणी वापरणे नगर पालिकेला कमी खर्चिक असल्याने तेरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात उचलण्यात येत आहे. तेरणा धरणाची एकूण पाणी क्षमता २१००.४० दलघमी आहे. आजच्या परिस्थितीमध्ये तेरणा प्रकल्पात १.७३० दलघमी पाणीसाठा आहे. त्यामध्ये ०.८९० दलघमी मृत साठा आहे. त्यामुळे सध्या फक्त ०.८३९ दलघमी उपयुक्त पाणीसाठा वापरासाठी योग्य आहे, म्हणजे ४.२७ टक्के पाणी वापरासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्र जिवन प्राधीकरणच्या वतीने गेली अनेक वर्ष होणारा तेर-ढोकी-तडवळा व येडशी चार गाव पाणीपुरवठा योजना बंद होती. त्या योजनेचे पुर्नजिवन करण्यासाठी ४ कोटी ५२ लाख रुपये निधी १९ डिसेंबर रोजी मंजूर करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, कितीही तातडीने दुरूस्तीचे काम झाले तरी किमान दोन महिन्याचा कालावधी लोटणार आहे. तोपर्यंत तेरणा धरणात किती पाणी शिल्लक राहिल यावर योजनेचे भवितव्य अवलंबून आहे.

 

तेर परिसरातील सर्व प्रकल्प मृत, कोरडेठाक 
तेरणा प्रकल्प शाखेतंर्गत येणाऱ्या कोंड साठवण तलावात ०.५६ टक्के पाणी आहे. घुगी ल.पा.संत गोरोबाकाका को.प.बंधारा व रामवाडी को.प.बंधारा या पुर्वीच कोरडेठाक पडले आहेत. जागजी साठवण तलावाचेही पाणी मृत साठ्यात आहे. यामुळे भविष्यात तेर व परिसरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. यासाठी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. 

 

तेरणेच्या मृत साठ्यात अवघे ४ टक्के पाणी 
तेरणा प्रकल्पातील मृत साठ्यात अवघा चार टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. इतर सर्व तलाव कोरडेठाक पडले आहेत. मृत साठ्यात पाण्यासोबत गाळही असल्याने पाणी किती दिवस पुरेल हे निश्चित सांगता येणार नाही. यासाठी नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याची गरज आहे. -आय. पी. बांगड, शाखाधिकारी तेरणा मध्यम प्रकल्प. 
 

बातम्या आणखी आहेत...