आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​मराठवाड्याच्या दुष्काळावर शिक्कामोर्तब! आयएमडीच्या अहवालात 22 टक्के कमी पाऊस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मान्सूनच्या दीर्घकालीन अंदाजावर हवामान खात्याने (आयएमडी) रविवारी पत्रक जारी केले. यानुसार देशात यंदा सरासरीपेक्षा ९% कमी पाऊस पडल्याचे नमूद असून दीर्घकालीन अंदाजाच्या दृष्टीने हा फरक फार परिणामकारक नाही. मात्र, महाराष्ट्रात पावसाने मारलेली दडी आणि मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर आयएमडीने यात शिक्कामोर्तब केले आहे. 
आयएमडीनुसार जिल्हानिहाय आकडेवारीनुसार कोकण-गोवा (१% कमी), मध्य महाराष्ट्र (९% कमी) व विदर्भात (८% कमी) सरासरी पाऊस पडला. १ ते ९ टक्के कमी पावसाचे प्रमाण दीर्घकालीन अंदाजामध्ये सरासरीएवढेच मानले जाते, असे आयएमडीचे म्हणणे आहे. मराठवाड्यात मात्र पावसाच्या तुटीचे प्रमाण उणे २२% राहिले. राज्यातील ३५ पैकी १३ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असून यातील बहुतांश जिल्हे मराठवाड्यातील आहेत. 

बातम्या आणखी आहेत...