आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार, फडणवीसांच्या हस्ते रविवारी किल्लारीत दुष्काळमुक्त अभियानाचा प्रारंभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने लातूर व उस्मानाबाद जिल्हे पूर्णपणे दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने आयोजित 'सुजलाम सुफलाम कार्याचा निर्धार' समारंभ रविवारी किल्लारी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार राहणार अाहेत. या वेळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. 


या वेळी संभाजी पाटील निलंगेकर, अर्जुन खोतकर, अमित चंद्रा, वल्लभ भन्साळी, खा. सुनील गायकवाड, प्रा. रवींद्र गायकवाड, आ. अमित देशमुख, आ. मधुकरराव चव्हाण, आ. बसवराज पाटील, दिलीपराव देशमुख, आ. राणा जगजितसिंह पाटील उपस्थित राहणार आहेत. या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जैन संघटनेने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...