आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांची घाेषणा: दुष्काळाचे अनुदान 15 मार्चपर्यंत थेट खात्यात, राष्ट्रवादीच्या विकासकामांचा शुभारंभ, रेलचेल भाजपची ! 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - ३१ ऑक्टोबरला राज्यात दुष्काळ जाहीर झाला. मराठवाड्याचा बहुतांश भाग दुष्काळाने होरपळत अाहे. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी १५ मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दुष्काळी अनुदान जमा करण्यात येणार असल्याची घाेषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी बीडमध्ये केली. बीड जिल्ह्यासाठी राज्य सरकारने सहाशे काेटी अनुदान जाहीर केले असून, त्याचा पहिला हप्ताही मंजूर झाल्याचे ते म्हणाले. 

 

राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या बीड न. प. च्या विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण मल्टिपर्पज क्रीडांगणावर झाले. या प्रसंगी मुख्यमंत्री बाेलत हाेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री पंकजा मुंडे होत्या. राष्ट्रवादीचे आमदार क्षीरसागर, भाजपचे आ. सुरेश धस, आर. टी. देशमुख, भीमराव धोंडे, बदामराव पंडित, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आदी या वेळी उपस्थित होते. 

 

व्यासपीठावर मुख्यमंत्री-पंकजा. या कार्यक्रमात पंकजा म्हणाल्या, "मुंडे साहेबांनी घर फोडण्याचे पातक कधीच केले नाही. रक्ताचे नाते तुटल्याचे दु:ख मी भोगत आहे.' 

 

कार्यक्रम राष्ट्रवादीचा, घोषणा मात्र भाजपच्या 
पंतप्रधान आवास :
या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात ५ लाख घरे पूर्ण असून आणखी ५ लाख घरे पूर्ण हाेतील.. 
बेघरांना दिलासा : नगरपालिका हद्दीमधील बेघरांचे प्रस्ताव पाठवल्यास ते सर्व प्रस्ताव मंजूर केले जातील, अशी फडणवीस यांची हमी. 
अतिक्रमणे नियमित : राज्यातील धोरणानुसार बीडमधील अतिक्रमणेही नियमित करणार. 

 

बातम्या आणखी आहेत...