आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाकळी खंडेश्वरीत केंद्रीय पथकाने केली दुष्काळी परिस्थितीची पाहणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाकळी खंडेश्वरी येथे केंद्रीय पथकासमवेत पालकमंत्री राम शिंदे. - Divya Marathi
टाकळी खंडेश्वरी येथे केंद्रीय पथकासमवेत पालकमंत्री राम शिंदे.

कर्जत - टाकळी खंडेश्वरी येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी केंद्र सरकारच्या तीन सदस्यीय पथकाने केली. या पथकात केंद्रीय विभागाचे सहसंचालक सुभाषचंद्र मीना, पशुधन व दुग्धविकास विभागाचे एल. जी. टेंभुर्ण, विजय ठाकरे यांचा समावेश होता. राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह हेही या पथकासमवेत होते. पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांनी पथकाशी चर्चा करुन दुष्काळी परिस्थितीची माहिती दिली. पथकाने शेतकऱ्यांची संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली. 

 

 

बातम्या आणखी आहेत...