आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट; नऊ मध्यम प्रकल्प काेरडेठाक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- खान्देशात पावसाने दडी मारल्याने जळगाव जिल्ह्यात दुष्कासदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. निम्मा पावसाळा संपत आला असताना जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेल्या अत्यल्प साठ्यामुळे चिंता वाढली अाहे. मोठे, मध्यम आणि लघुप्रकल्पांमध्ये केवळ २२.३५ टक्केच साठा शिल्लक असून त्यातही १३ पैकी ९ मध्यम प्रकल्प काेरडेठाक पडल्याने टंचाईची स्थिती निर्माण हाेण्याची भीती अाहे. 


जळगाव जिल्ह्यातील हतनूर, वाघूर अाणि गिरणा या तीन माेठ्या प्रकल्पांमध्ये जेमतेम २७.३५ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक अाहे. मध्यम प्रकल्पांची स्थिती अतिशय वाईट अाहे. जिल्ह्यात १३ मध्यम प्रकल्प अाहेत. या प्रकल्पांपैकी तब्बल ९ प्रकल्प काेरडे पडले अाहेत. माेर, अग्नावती, हिवरा, बहुळा, ताेंडापूर, अंजनी, भाेकरबारी, बाेरी, मन्याड हे प्रकल्प काेरडे पडले अाहेत. या प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा शून्यावर आला.

बातम्या आणखी आहेत...