आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपती विसर्जनासाठी गेलेले दोन मुले बुडाली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब- घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी गेलेली राळेगाव येथील दोन मुले नदी पात्रात बुडाली. ही दुर्देवी घटना राळेगाव तालुक्यातील कापसी येथे सोमवार, २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. हनुमान उईके वय १९ याचा मृतदेह नदीत आढळला असून, संकेत तुमराम वय १३ याचा शोध सुरू आहे. वृत्त लिहीपर्यंत संकेतचा शोध लागला नव्हता. 


या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, सोमवारी राळेगाव शहरात मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन सुरू होते. शहरातील गोंडपुरा प्रभाग क्रमांक १ येथील १० ते १२ जण घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी तालुक्यातील कापसी येथील नदी पात्रावर गेले होते. या दरम्यान सकाळी ११ च्या सुमारास गणपतीचे विसर्जन करत असताना नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने हनुमान उईके आणि संकेत तुमराम हे दोघेही बुडाले. या घटनेमुळे खळबळ उडाल्याने राळेगाव येथील नागरिकांनी कापसी नदीकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच राळेगावचे ठाणेदार संजय खंदाडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. दरम्यान, नदी पात्रात दोघांचाही शोध सुरू करण्यात आला. त्यावेळी हनुमान उईके याचा मृतदेह सापडला असून संकेत तुमराम याचा शोध पोलिसांनी सुरू केला. या वेळी पोलिसांनी हनुमान याचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता रुग्णालयात पाठवला होता. वृत्त लिहीपर्यंत संकेतचा शोध लागलेला नव्हता. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संजय खंदाडे यांच्या मार्गदर्शनात राळेगाव पोलिस करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...