आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहाता- गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजता पिंपळस येथे घडली. सागर रमेश कदम (२४) असे त्याचे नाव आहे. सागर व त्याच्याबरोबर ५ वीत असलेला निशांत कदम घरातील गणपतीचे विसर्जन करण्यासाठी निरगुडे वस्तीजवळ दहेगाव पिंपळस कातनाल्याजवळ असलेल्या तळ्यात गेले होते. सागरचा तोल जाऊन तलावाच्या कडेला गाळात तो पडला. तो गाळात फसला. निशांतने शेजारी असलेल्या लोकांना मदतीसाठी बोलवले. स्त्री व पुरूषांनी सागरला वाचवण्यासाठी साड्यांचे पदर व दोर सोडले, परंतु गाळ असल्याने तो बुडाला. त्याचा मृतदेह एक तासाने नागरिकांनी वर काढला. शवविच्छेदनानंतर रात्री साडेअकरा वाजता वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 


साखरपुडा झाला होता... 
सागरचा या गुरूवारी साखरपुडा झाला होता. १८ डिसेंबरला त्याचा विवाह होणार होता. सागर हा आईृवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. विसर्जनापूर्वी सागरला अनेक जणांनी सांगितले होते, तू सार्वजनिक गणपतीत तुझी मूर्ती विसर्जनासाठी ठेव. तथापि, म १० मिनिटांत विसर्जन करून येतो, असे म्हणून तो गेला व काळाने त्याच्यावर घाला घातला. 

बातम्या आणखी आहेत...