आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उडता काश्मीर : काश्मिरींसाठी पिझ्झा ऑर्डर करावा इतके ड्रग्ज सहज होते उपलब्ध

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - काश्मीरचे नाव ऐकताच मनात सर्वप्रथम तेथील निसर्गसुंदर खाेरे, रम्य वातावरणाची कल्पना येते. परंतु पृथ्वीवरील स्वर्ग असलेल्या काश्मीरला आता ड्रग्जचा विळखा घातला आहे. श्री महाराजा हरिसिंह (एसएमएचएस) रुग्णालयाचे ड्रग-डी अॅडिक्शन सेंटरच्या आेपीडीमध्ये डाॅक्टरांसमाेर इयत्ता दहावीत शिकणारा अजाज अहमद (नाव बदललेले) बसलेला आहे. अजाज चरसच्या पहिल्या कशपासून हेराॅइनच्या इंजेक्शनच्या नशेपर्यंतच्या सर्व प्रश्नांची एक-एक करून ताे उत्तरे देऊ लागला. अनंतनागच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील हा १५ वर्षीय मुलगा आठव्या वर्गात असल्यापासून नशापान करताे. अजाज हिपॅटायटिसनेदेखील आजारी आहे. कारण ताे मित्रांनी वापरलेल्या सिरिंजचा वापर करताे. काही मित्र मला हेराॅइन विकत घेण्यासाठी संगमला घेऊन गेले हाेते. हेराॅइन प्रति ग्रॅम १८०० रुपये भावाने खरेदी करावे लागते. मी केवळ अर्धा ग्राम खरेदी करत असे. खुलेआमपणे ड्रग्ज िवकणारी घरेही तेथे आहेत. काेडीनसह सर्व प्रकारचे ड्रग्ज येथे सहजपणे उपलब्ध हाेतात. एसएमएचएसच्या डाॅक्टरांच्या मते पंजाबप्रमाणेच काश्मीरदेखील ‘उडता काश्मीर’मध्ये रूपांतरित झाले आहे. एसएमएचएस ड्रग डी- अॅडिक्शन सेंटरचे अधीक्षक डाॅ. सलीम युसूफ म्हणाले, राज्याला अमली पदार्थांच्या नशेने विळखा घातलेला आहे. पिझ्झा आॅर्डर करावा, इतक्या सहजपणे ड्रग्ज उपलब्ध हाेतात. येथे तुम्हाला दहा वर्षांचा मुलगाही ड्रग्जच्या विळख्यात अडकलेला आहे. बेराेजगारी हेच तरुणांना या गर्तेत ढकलण्यामागील महत्त्वाचे कारण ठरले आहे. सहज उपलब्धता हे दुसरे कारण आहे. मित्रांनी वारंवार सांगितल्यामुळे तरुण प्रभावित हाेतात.डाॅ. सलीम म्हणाले, एका अहवालानुसार महिलादेखील व्यसनाधीन हाेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नशा करणाऱ्यांमध्ये १२ टक्के महिला आहेत. महिलांमध्ये ड्रगच्या व्यसनाचा सामाजिक ताण दिसून येताे.

बातम्या आणखी आहेत...