आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता दिलीप ताहिलवर ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा; मद्यधुंद अवस्थेत रिक्षाला उडवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मद्यधुंद अवस्थेत अभिनेता दिलीप ताहिल यांनी एका रिक्षाला उडवल्याची घटना गणेश विसर्जनाच्या दिवशी मुंबईत घडली. याप्रकरणी रिक्षातील प्रवासी जेनिता गांधी आणि गौरव चॉग यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर ताहिल यांना अटक करण्यात आली. जामिनावर त्यांची मुक्तता करण्यात आली. 


गणेश विसर्जनाच्या दिवशी ताहिल यांनी सांताक्रुझ येथे एका रिक्षाला उडवले. मात्र, प्रचंड वाहतूक असल्याने त्यांना पुढे जाता आले नाही. रिक्षातील प्रवासी जेनिता गौरव यांनी ताहिल यांना जाब विचारला असता त्यांनी दोघांना धक्काबुक्की केली. दोघांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पाेलिसांनी त्यांना अटक करून ड्रंक अँड ड्राइव्हचा गुन्हा नोंदवला. 

बातम्या आणखी आहेत...