आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्यधुंद कारचालकाची चार दुचाकींना धडक, तिसगाव फाटा येथील घटनेत दोघे गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - औरंगाबाद-नगर महामार्गावर छावणी उड्डाणपूल ओलांडून भरधाव आलेल्या कारने (एमएच २० ईई २८८८) समोरील चार दुचाकीस्वारांना धडक दिली. यात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास तिसगाव फाट्यासमोर घडली. वाहतूक पोलिसांनी मद्यधुंद चालकाला ताब्यात घेत जखमींना घाटीत दाखल केले. शनिवारी सायंकाळी ६.१५ वाजता काळ्या रंगाची कार औरंगाबादहून वाळूजच्या दिशेने भरधाव येत होती.


कारमधील पाच तरुण मद्यधुंदावस्थेत होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने समोरील दुचाकीला (एमएच २० ईटी ५९४७) पाठीमागून जोराची धडक दिली. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढण्याच्या नादात समोरील दुसऱ्या दुचाकीला (एमएच १६ एपी ४४९) धडक दिली. त्यानंतर पुन्हा दोन दुचाकींना धडक देत कार लगतच्या काटेरी झुडपांमध्ये जाऊन थांबली. यात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. नागरिकांनी कारमधील पाच तरुणांना कारबाहेर काढले तेव्हा सर्व जण मद्यधुंद होते. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना घाटीत नेले. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

बातम्या आणखी आहेत...